फुलंब्रीत काँग्रेसचा अंतर्गत स्फोट! तिकीट वाटपावरून संतप्त कार्यकर्त्यांनी खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. निष्ठावंतांना डावलून ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याचा गंभीर आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
कार्यकर्त्यांच्या संतापाचे मुख्य कारण तिकीट वाटपातील कथित गैरव्यवहार हे आहे. पाल जिल्हा परिषद गटातून माजी युवक काँग्रेस अध्यक्ष वरुण पाथ्रीकर यांच्यासारख्या निष्ठावंताला डावलून शेवटच्या क्षणी ज्ञानेश्वर जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. तसेच बाबरा गटात अजिनाथ सोनवणे यांना आश्वासन देऊनही ऐनवेळी डावलल्याने कार्यकर्त्यांचा संयम सुटला. “पैसे घेऊन तिकीट वाटप केले जात असून काँग्रेस संपवण्याचे काम सुरू आहे,” असा गंभीर आरोप करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.
खासदारांच्या भावाला आणि अध्यक्षांना घातला घेराव
दुपारी ३ च्या सुमारास शेकडो कार्यकर्ते कार्यालयात शिरले. त्यांनी केवळ घोषणाबाजीच केली नाही, तर खुर्च्या, टेबल आणि फर्निचरची मोडतोड केली. यावेळी खासदारांचे बंधू जगन्नाथ काळे आणि तालुकाध्यक्ष संतोष मेटे यांना कार्यकर्त्यांनी तब्बल अर्धा तास घेराव घालून जाब विचारला.
Beed Crime: बाप रे! पत्नीच्या प्रियकराने पतीलाच घरातून हाकललं; पत्नी आणि प्रियकराच्या छळाला कंटाळून पतीने संपवलं आयुष्य, बीड हादरलं
परिस्थिती इतकी गंभीर होती की, तिथे उपस्थित असलेले विश्वास औताडे यांनी तातडीने पळ काढला.
काँग्रेससमोर निवडणुकीत मोठे आव्हान
निवडणुकीच्या ऐन तोंडावर झालेल्या या राड्यामुळे काँग्रेसची मोठी नामुष्की झाली आहे. गटबाजी आणि असंतोष समोर आल्याने याचा फटका मतदानावर होण्याची शक्यता आहे. निधोना पंचायत समिती गटातील नाराजीही पक्षासाठी डोकेदुखी ठरणार आहे. आता पक्षश्रेष्ठी या प्रकरणावर काय पडदा टाकतात आणि बंडखोरी रोखण्यात त्यांना किती यश मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पैठणमध्ये भाजप–शिंदेसेना युती तुटली; भुमरेंच्या बालेकिल्ल्यात राजकीय भूकंप
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदारसंघात भाजप आणि शिंदेसेना यांची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीची युती तुटली आहे. आमदार विलास भुमरे व खासदार संदिपान भुमरे यांच्या बालेकिल्ल्यात भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी युती तोडल्याची माहिती आहे. भाजप नेते दत्ता गोर्डे यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला असून पैठण तालुक्यातील ९ जागांवरील युती संपुष्टात आली आहे. विशेष म्हणजे काल सायंकाळीच युतीची घोषणा करण्यात आली होती आणि भाजपने उमेदवारांना एबी फॉर्मही दिले होते. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
