Maharashtra Weather Today : राज्यात तापमानाचा पारा पुन्हा एकदा कमी झाला आहे. हवामानात सतत चढ-उतार होत असून याचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचं चित्र आहे.
नाशिकमध्ये रविवारी (दि.18) रात्रीपासून अचानक गारवा वाढला आहे. सोमवारी पहाटे गारवा अधिकच जाणवला. दिवसभर गारवा कायम होता. विशेषतः हवेतील गारवा दिवसभर कायम राहिल्याने बोचऱ्या थंडीचा प्रत्यय येत होता. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड हवेच्या प्रभावामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यात गारठा वाढल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चार-पाच दिवसांत हे तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे.
Weather Today : किमान तापमानात सतत चढ-उतार, बदलत्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम
रविवारी सकाळी शहरात 13 अंश सेल्सियस तापमान नोंदविले गेले होते. 24 तासांत ते सुमारे दीड अंश सेल्सियसने कमी झाले. नाशिकमध्येच नाही, तर महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये अचानक तापमान कमी होऊन गारठा वाढत असल्याचा प्रत्यय येत आहे. येत्या चार-पाच दिवसांत हे तापमान आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून हवामानात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अचानक तापमान कमी – जास्त होत असल्याने त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांना आरोग्याच्या तक्रारी होत असून सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं चित्र आहे.
शहरातील किमान तापमान
अहिल्यानगर – 14.6
छत्रपती संभाजीनगर – 16.4
जळगाव – 11.8
मालेगाव – 11.8
नंदुरबार – 13.5
धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली
मुंबईतही गारवा वाढला
दरम्यान, मुंबईतही हवेत गारवा वाढला आहे. दुपारी उष्णता जाणवत असली, तरी रात्री आणि पहाटेच्या वेळी गारठा कायम आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. मात्र आता पुन्हा एका तापमानात घट झाल्याचं चित्र आहे. त्याशिवाय हवेत धुकंही आहे. सकाळच्या वेळी मुंबईत दृष्यमानता कमी असून धुकं पसरलं आहे.
