महेश पाटील, नंदुरबार: अल्पवयीन मुले व समवयस्क युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत लैंगिक शोषण करणाऱ्या २२ वर्षीय संशयिताला नंदुरबार शहर पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. त्याच्या मोबाईलमध्ये अल्पवयीन मुले व युवकांशी संबंधित अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व छायाचित्रे आढळले. सोशल मिडीयावर व्हिडिओ व छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत सुमारे ५० पेक्षा जास्त बालक व युवकांवर चार वर्षांत त्याने अत्याचार केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी दिली.
शहरातील रायसिंगपुरा येथील संशयित हा अल्पवयीन मुले तसेच समवयस्क युवकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याशी जवळीक निर्माण करत अत्याचार करत असल्याची माहितीच्या पोलिसांनी मिळाली. ६ ऑगस्ट रोजी संशयित एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी नंदुरबार शहरालगतच्या भोणे फाटा परिसरातील एका पपईच्या शेतात बोलावणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी साध्या वेशात परिसरात पाळत ठेवली. संशयित घटनास्थळी येताच पोलिसांनी त्याला घेरले. पोलिसांच्या तावडीतून निसटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चेतन प्रकाश कोळी या संशयिताला पथकाने ताब्यात घेतले.
चेतन कोळी याला नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पंच व फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान मोबाईलमधील गुप्त फोल्डरमध्ये अल्पवयीन मुले व युवकांशी संबंधित अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ व छायाचित्रे आढळली. फॉरेन्सिक पथकाने संबंधित डिजिटल पुरावे जतन केले आहेत. या प्रकरणी पोकॉ.रुपेश पगारे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०८ (३), ३५१ (२), तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ आणि बालकांची काळजी व संरक्षण अधिनियम २०१५ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख करीत आहेत.
दरम्यान, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मागदर्शनाखालीपोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक निकिता पाटील, हे.कॉ. जगदीश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश पगारे, राजेंद्र कटके, अमित भरवाड, आनंदा मराठे व पोलीस शिपाई निंबा वाघमोडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
५० पेक्षा अधिक पीडित
प्राथमिक तपासात संशयिताने २०२२ पासून अल्पवयीन मुले व युवकांना लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. लैंगिक शोषण करुन त्याचे व्हिडिओ व छायाचित्रे मोबाईलमध्ये साठवून ठेवत सोशल मीडियावर प्रसारीत करण्याची धमकी देत सुमारे ५० पेक्षा जास्त बालक व युवकांवर असल्याचा आरोप आहे. या डिजिटल सामग्रीचा वापर करून संबंधितांना धमकावले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील संभाव्य पीडितांची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा