Mayor Reservation Lottery : महापौरपदाच्या आरक्षण सोडतीची घोषणा अद्याप बाकी असून त्यासाठी सोडतीची तारीख जाहीर करण्यात आली आहे
22 जानेवारी रोजी मुंबई येथे 29 महानगरपालिकांच्या महापौर पदाची आरक्षण सोडत होणार आहे. यासंदर्भात नगर विकास विभागाकडून अध्यादेश जारी करण्यात आला आहे. 22 तारखेला सकाळी 11 वाजता मुंबई येथे ही आरक्षण सोडत होणार आहे. महापौर पदाचे आरक्षण हे सोडत पद्धतीने काढले जाते, मात्र एक प्रकारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगर विकास विभागाकडे ही जबाबदारी असल्याने महापौरपदाचा पेच ‘शिंदे’ सोडवणार, अशी चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाचे पत्र काय?
राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदाचे आरक्षण निश्चितीसाठी आरक्षणाची सोडत मा. राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार, दि.२२.०१.२०२६ रोजी, परिषद सभागृह, ६ वा मजला, मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ११.०० वा. पासून आयोजित करण्यात आली आहे. तरी, सदर बाब मा. राज्यमंत्री (नगर विकास) महोदयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती.
आपला,
(अनिरुध्द जेवळीकर) शासनाचे उप सचिव
BJP victory in BMC : विकास, मराठी माणूस, मॅनेजमेंट आणि प्लानिंग. भाजपनं अशी जिंकली मुंबई
दुसरीकडे, मुंबई महापौरपदाची शर्यत रंगली असताना, कल्याण डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि भाजप यांच्यात पडद्याआड चर्चा सुरु असल्याचे वृत्त समोर आले आहे. मुंबईच्या महापौर निवडीवेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना असल्याची माहिती आहे. त्यामुळे बहुमताचा आकडा कमी होऊन भाजपच्या महापौर निवडीचा मार्ग सुकर होईल अशी चर्चा आहे.
