गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका निवडणुका पूर्ण होताच मेट्रो 2B आणि मेट्रो 9 सुरू करण्यात येतील, असं आश्वासन देण्यात येत होतं. मंडाळे ते डायमंड गार्डन जोडणारी मेट्रो 2B आणि दहिसर ते काशिगाव जोडणारी मेट्रो 9 या मार्गिकांचं उद्घाटन डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं. मात्र, महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला.
Pune Municipal Election Result : पुण्याचा कारभारी ठरण्याआधीच भाजपचा महापौरही ठरला? फडणवीस-मोहोळांच्या निकटवर्ती नेत्याचे पोस्टर व्हायरल, पाहा कोण?
निवडणुकानंतर मेट्रोला सुरूवात
आता निवडणुका पार पडल्याने या मेट्रो मार्गिकांच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दहिसर ते सुभाष चंद्र बोस स्टेडियम जोडणाऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून, ही मेट्रो 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनी प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
डिसेंबर महिन्यात या मार्गिकेची चाचणी घेण्यात आली होती. चाचणीदरम्यान आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी MMRDA ला काही सूचना देण्यात आल्या होत्या. त्या त्रुटी दूर करण्यात आल्याचं सांगण्यात येत असून, त्यामुळे लवकरच मेट्रो सेवा सुरू होऊ शकते. मात्र, अद्याप सीएमआरएस (CMRS) कडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळालेलं नाही. येत्या आठवड्यात हे प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर 4.4 किमी लांबीच्या या टप्प्याला हिरवा कंदील मिळणार आहे.
BMC Result | मुंबई महापालिकेवर सत्ता कुणाची? ठाकरे बंधू की महायुती? मुंबईकरांनी मनातलं सांगितलं
मेट्रो लाईन 9 ची एकूण लांबी 13.5 किमी आहे. दहिसर पूर्वेपासून सुरू होणाऱ्या या मार्गिकेचा सध्या फक्त एक टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. या टप्प्यात दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशीगाव अशी चार स्थानकं असतील. मेट्रो 9 आणि मेट्रो 7A सुरू झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 पासून थेट मिरा-भाईंदरपर्यंत अखंड मेट्रो जोडणी उपलब्ध होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे.
