शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी मटा कट्ट्यावर आले होते.यावेळी वरुण सरदेसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.रिअल इस्टेटसाठी मुंबईचा राक्षसी विकास करण्यात येतोय अशी टीका सरदेसाईंनी केली.मूळ मुंबईकर मुंबईतच राहावा असं आमचं धोरण असेल असं सरदेसाई म्हणाले.तसंच मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो ठाकरे बंधूच ठरवतील असंही सरदेसाईंनी सांगितलं.