Pune News: पुणे-सोलापूर महमार्गावरील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता या मार्गावर स्थानिक आणि मुख्य महामार्गावरील वाहतूक कोंडी वेगळी करण्यासाठी 7 भुयारी अंडरपास बांधण्यात येणार आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत असून, हे अपघात रोखण्यासाठीच या सात अंडरपासची उभारणी करण्यात येत आहे. यापैकी तीन अंडरपासचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित चार अंडरपासचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या भुयारी मार्गांमुळे महामार्गावरील वाहतुकीचा कालावधी कमी होणार असून प्रवास अधिक वेगवान होईल. यासोबतच अपघातांची संख्या घटेल आणि इंधनाचीही बचत होणार आहे.
Mumbai News: वाहतूक कोंडीसाठी 4 पदरी शॉर्टकट, वांद्रे-कलिनाला थेट जोडतो; पण एका कारणामुळे नागरिकांसाठी ठरत आहे डोकेदुखी…
यापूर्वी जून 2025 मध्ये मंजूर करण्यात आलेला हडपसर ते यवत उड्डाणपूल प्रकल्प हा पुणे-सोलापूर महामार्गावरील तीव्र वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी एकूण 5,232 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. मात्र, जूनमध्येच प्रकल्पाच्या विस्ताराला मंजुरी मिळाल्याने उड्डाणपुलाची लांबी सुमारे 4.5 किलोमीटरने वाढणार आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे महामार्गावरील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर दररोज सुमारे 40 ते 50 हजार वाहनांची ये-जा होते. पश्चिम आणि पूर्व महाराष्ट्राला जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग असून, तो राज्यासह देशातील अनेक भागांना जोडतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि हैद्राबादसारख्या भागांकडे जाण्यासाठी हा महामार्ग प्रमुख दुवा मानला जातो. त्यामुळे या महामार्गावर अंडरपास उभारणे अत्यंत आवश्यक ठरत होते.
Mahesh Landge | अजित पवारांनी फसवलं, पिंपरी चिंचवडकरांचा भ्रमनिरास, महेश लांडगेंचा घणाघात
कसे असतील हे अंडरपास?
पुणे-सोलापूर महामार्गावर एकूण सात अंडरपास बांधण्यात येणार असून, त्यापैकी तीनचे काम पूर्ण झाले आहे. प्रत्येक अंडरपास सुमारे 30 मीटर रुंद आणि 5.5 मीटर उंच असेल. बॉक्सच्या स्वरूपातील या भुयारी मार्गांच्या वरून महामार्गावरील मुख्य वाहतूक सुरू राहणार असून, खालील मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुला असेल. मुख्य व स्थानिक वाहतूक वेगवेगळ्या मार्गांवरून सुरू राहिल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. प्रत्येक भुयारी अंडरपाससाठी अंदाजे 20 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.
