पुण्याच्या राजकारणात आता अजित दादा विरुद्ध मुरलधीर अण्णा असा संघर्ष पेटताना दिसतोय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या उमेदवारांवरुन मुरलीधर मोहोळ यांनी टीका केली आहे.
शहरातील उमेदवारी वाटपावरून सुरू असलेल्या वादावर मुरलीधर मोहोळ यांनी भाष्य केलं. भाजपने नेहमीच स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. वार्ड क्रमांक ३८ मधील प्रतिभा चोरघे यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की, त्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात झोकून देऊन काम करत आहेत. “दुसऱ्या पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट दिले असले तरी, भाजपने असे पाऊल उचललेले नाही. पुणेकर सुज्ञ आहेत, कोणाची नियत काय आहे हे ते ओळखून असून निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून ते या प्रवृत्तींना नक्कीच उत्तर देतील,” असा टोलाही त्यांनी लगावला.
Ahilyanagar News : अहिल्यानगरच्या राजकारणात भूकंप, मनसेचे 2 उमेदवार बेपत्ता, अपहरणाचा संशय
यावेळी मोहोळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्यात झालेल्या विकासकामांचा आढावा घेतला. मेट्रोचा विस्तार, २४/७ पाणीपुरवठा योजना, वैद्यकीय महाविद्यालयाची निर्मिती, चांदणी चौक प्रकल्पाचे काम आणि विमानतळाचे नवीन टर्मिनल यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे पुण्याचे चित्र बदलले आहे. हे विकासाचे राजकारण पुणेकरांना भावले असून, नागरिक पुन्हा एकदा महायुतीला आणि भाजपलाच कौल देतील, असे त्यांनी नमूद केले. तसेच, भाजपने ५० टक्के आरक्षणापेक्षाही जास्त म्हणजे तब्बल ९२ महिलांना उमेदवारी देऊन महिला सक्षमीकरणाचा नवा पायंडा पाडल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले.
KDMC Election : नाद करा पण महायुतीचा कुठे, तब्बल 9 नगरसेवक निकालाआधीच बिनविरोध विजयी, वाचा A टू Z यादी
महायुतीमधील जागावाटपाच्या पेचावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भाजप, शिवसेना आणि आरपीआय यांची युती टिकावी अशी कार्यकर्त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. भाजपने शिवसेनेला १६ जागांचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यांनी त्यापेक्षा अधिक ‘एबी’ फॉर्मचे वाटप केल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला आहे. स्थानिक स्तरावर जागांचा हा तिढा सुटू न शकल्याने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच यावर अंतिम निर्णय घेतील. दरम्यान, आरपीआयला ८ जागा सोडण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमाला मत्री चंद्रकांत पाटील, केशव उपाध्ये, दिलीप कांबळे यांच्यासह भाजपचे अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
