BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्जांची छाननीदेखील करण्यात आलेली आहे. आता लवकरच प्रचाराला सुरुवात होईल.
मुंबईच्या प्रभाग क्रमांक १७३ मधील शिल्पा केळुसकर यांना भाजपमधून उमेदवारी हवी होती. ण त्यांना पक्षानं संधी दिली नाही. त्यामुळे त्यांनी थेट बनावट एबी फॉर्मचा वापर करत निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. आश्चर्याची बाब म्हणजे आयोगानं हा अर्ज वैध ठरवला. शिल्पा केळुसकर यांचा अर्ज वैध ठरताच त्यांचे पती दत्ता केळुसकर नॉट रिचेबल झाले आहे. त्यामुळे भाजपची गोची झाली आहे.
BMC Election 2026: सोमय्यांच्या लेकाचा विजय फिक्स; ठाकरे बंधूंचा उमेदवारच नाही; किरीटभाई म्हणतात, देवाची लीला अगाध
युतीच्या जागावाटपात प्रभाग क्रमांक १७३ शिंदेसेनेला गेला आहे. शिंदेसेनेनं माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या पत्नी पूजा कांबळे यांना संधी दिली आहे. पण भाजपच्या शिल्पा केळुसकर यांनी बनावट एबी फॉर्मच्या आधारे अर्ज भरला आहे. यासंदर्भात भाजपनं निवडणूक आयोगानं तक्रार दाखल केली आहे. केळुसकर यांचा अर्ज माघारी घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरु आहेत.
ठाकरेंच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद? शिंदेसेनेचा ‘डिजिटल’ आक्षेप; ओळीनं विकेट पडणार?
मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी याबद्दल निवडणूक आयोगाला तातडीनं पत्र दिलं. शिल्पा केळुसकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची मागणी त्यांनी पत्रातून केली. शिल्पा केळुसकर यांना पक्षानं आधी एबी फॉर्म दिला होता. पण नंतर तो पक्षानं काढून घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या केळुसकर यांनी डुप्लिकेट एबी फॉर्म तयार केला. फॉर्मची कलर झेरॉक्स त्यांनी निवडणूक अर्जासोबत जोडली. त्यामुळे आता मुंबई भाजपची धावपळ सुरु झाली आहे.
