Crime News : ३३ वर्षीय विकी परदेशी या विवाहित तरुणाचे विरार येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. विकी प्रेयसीला घेऊन वसईतील कळंब समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या आनंदी जीवन फार्म हाऊस लॉजवर गेला होता.
नेमकं काय घडलं?
नालासोपारा येथील रहिवासी असलेल्या ३३ वर्षीय विकी परदेशी या विवाहित तरुणाचे विरार येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. विकी प्रेयसीला घेऊन वसईतील कळंब समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या आनंदी जीवन फार्म हाऊस या लॉजवर गेला होता.
छातीत वेदना अन् प्रेयसी घाबरली
लॉजमध्ये सिगारेट ओढत असताना अचानक त्याच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्याची प्रकृती खालावली. विकीची प्रकृती अचानक खालावल्याने घाबरलेल्या प्रेयसीने लॉजवरील कर्मचाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर लॉजवरील कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तेथे तपासून मृत घोषित केले.
Manasi Gurav : ही आमची मानसी नसेल हो… गुरव कुटुंबाची घालमेल, मोबाईलमध्ये फोटो पाहत काळीज पिळवटणारा आक्रोश
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी आनंदी जीवन घटनास्थळी दाखल झाले. विकी परदेशी याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत लॉजमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असून प्रेयसी व लॉजवरील कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
Pranita Rasam : शूटिंग संपवून मायलेकी निघाल्या, मराठी मालिकेतील बालकलाकाराच्या आईचा भांडुप अपघातात मृत्यू, पूर्वाच्या डोळ्यासमोर…
मृत्यूचं कारण अस्पष्ट
मृत विकी परदेशी याला एनर्जी ड्रिंक पिण्याची सवय होती, त्याचप्रमाणे तो धूम्रपान देखील करत असल्याचे कळते. अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या तरुणाचा नैसर्गिक मृत्यू झाला की, त्याच्या मृत्यूमागे अन्य काही कारण आहे. याबाबतची स्पष्टता शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच समोर येणार आहे. या प्रकरणी अधिक तपास अर्नाळा पोलीस ठाण्यातील पोलीस करत आहेत.
ठाकरे हैं तो सेफ हैं, मराठी माणसा जागा हो! पत्नीसाठी वसंत नकाशे मैदानात
