ही बातमी नक्कीच उत्कंठा वाढवणारी आहे. त्याचं झालं असं…. महानगरपालिका निवडणुकांच्या नामांकनाचा आज शेवटचा दिवस.. वेळ सकाळी 11 ते 5.. मात्र एका उमेदवाराच्या हातात 2.30 वाजले असतांना सुद्धा अजूनही AB फॉर्म नाही. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर असं काय घडलं की उमेदवाराची धाकधूक वाढायला लागली! पाहूया सविस्तर..
युती संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी ‘आम्ही यादी जाहीर करणार नाही’ असं ठणकावून सांगितलेलं होतं. काल आणि आज मनसे-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने इच्छुक उमेदवारांनी एबी फॉर्म घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात शिवतीर्थ तसेच मातोश्रीवर गर्दी केलेली होती. पक्षातील प्रमुख नेते इच्छुक उमेदवारांना फोन करून एबी फॉर्म घेण्यासाठी कार्यालयाकडे बोलावत होते.
Pune News : गुन्हेगारांना टायरमध्ये घालून फोडण्याची भाषा करणाऱ्या अजित पवारांनी दिली आंदेकर, मारणे यांच्या कुटुंबियांना उमेदवारी
प्रभाग क्रमांक 128 हा ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मनसेकरिता सुटलेला प्रभाग आहे. महिला राखीव झाल्याने या प्रभागातून सई सनील शिर्के इच्छुक उमेदवार होत्या. मनसे मार्फत त्यांनी या प्रभागावर दावा केलेला होता. तसेच उमेदवारीसाठी राज ठाकरेंकडे मुलाखत सुद्धा दिली होती. मात्र भटवाडी, घाटकोपर येथील प्रभाग क्रमांक 128 मधील या इच्छुक उमेदवाराला नामांकन अर्ज दाखल करायची वेळ जवळ येऊन सुद्धा हातात एबी फॉर्म नसल्याने दुपारी 2.30 वाजेपर्यंत ताटकळत राहायची वेळ आलेली पाहायला मिळाली. संबंधित नेते दहा मिनिटे थांबा, दहा मिनिटे थांबा अशी वेळ मारून नेत होते तशी संबंधित उमेदवारांची धाकधूक वाढलेली होती.
शिवसेनेने 15 नावं दिली पण भाजपने वाचून चर्चाच बंद केली, ‘त्या’ उमेदवारांची यादी मटा ऑनलाईनच्या हाती
शेवटपर्यंत आपल्याला एबी फॉर्म मिळेल की नाही याची शाश्वती त्यांना वाटत नव्हती. शेवटी मनसेतील वरिष्ठ नेत्यांनी सूत्रे हलवत लवकरात लवकर सई सनील शिर्के यांना मनसेमार्फत AB फॉर्म वाटप करीत उमेदवारी जाहीर केली. नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी फार कमी वेळ राहिल्यामुळे सुरुवातीला सई शिर्के यांना सनील शिर्के यांनी लोकलने घाटकोपरला पाठवलं. परत दादर स्थानकातून शिवतीर्थ गाठत स्वतः AB फॉर्म घेत शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरायला मार्गस्थ झाले. यावेळी मात्र काही वेळापूर्वीची धाकधूक वेळेत नामांकन अर्ज दाखल केल्याने आनंदाच्या क्षणात परिवर्तित झालेली होती.
