KDMC Water Supply Cut: डोंबिवलीकरांचे वर्षाअखेरीस हाल होणार आहेत. केडीएमसीने संपुर्ण शहरात तब्बल 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद होणार असल्याची माहिती दिली आहे. कधी ते जाणून घ्या…
डोंबिवली शहरात पाण्याच्या टाकीच्या इनलेटमध्ये झालेल्या गळतीच्या तातडीच्या दुरुस्ती कामासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. हे काम 30 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे. हापालिकेच्या माहितीनुसार, उल्हास नदीतून मार्मोहिली उंडुंचन केंद्राद्वारे कच्चे पाणी उचलले जाते आणि 150 DLD क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रात त्यावर प्रक्रिया केली जाते. येथून शुद्ध केलेले पाणी शहराच्या पाणीपुरवठा जाळ्याद्वारे डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात वितरित केले जाते.
Pune News: वीकेंडला पुणेकर तहानले! जलवाहिनी फुटल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा बंद; कोणत्या भागांवर परिणाम?
पाण्याच्या टाकीची दुरुस्ती
KDMC ने X वरील पोस्टद्वारे माहिती दिली की, अमृत 2.0 योजनेंतर्गत खांबळपाडा येथे उभारण्यात आलेल्या उच्चस्तरीय पाण्याच्या टाकीच्या इनलेट भागात गळती आढळून आली आहे. ही योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून राबवली जात आहे. मुख्य जलवाहिनीस जोडलेल्या टॅपिंग पॉइंटवर ही गळती झाल्यामुळे पाण्याची मोठी नासाडी होत असून, वेळीच दुरुस्ती न केल्यास संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 30 डिसेंबरला हे काम हाती घेण्यात आले असून, लवकरात लवकर नागरिकांचा पाणी प्रश्न सोडवण्यात येणार आहे.
सकाळपासून रात्रीपर्यंत पाणीपुरवठा बंद
मंगळवार, 30 डिसेंबर रोजी सकाळी 9.00 ते रात्री 9.00 वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल 12 तास डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर आणि प्रणाली स्थिर झाल्यावर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल, असे KDMC ने स्पष्ट केले आहे.
Nitesh Rane | तुम्ही माझ्यावर सोडा, बांधता येतं तसं बंद करता येतं; कोळी समाजासाठी नितेश राणे मैदानात
नागरिकांना पाणी साठवण्याचे आवाहन
महापालिकेने नागरिक, गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक आस्थापनांना आधीच पुरेसे पाणी साठवून ठेवण्याचे आणि या काळात प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.निश्चित वेळेत काम पूर्ण करून शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासनही महापालिका अधिकाऱ्यांनी दिले आहे.
