Maharashtra News Live In Marathi : राज्यात नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडून त्यांचे निकाल नुकतेच जाहीर झाले. आता महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी जानेवारीमध्ये निवडणुका होतील. आजपासून महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तसंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्या अधिकृत युतीची घोषणा लवकरच करतील. युतीच्या घोषणेचा नारळ फोडल्यानंतर बीएमसी निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे उमेदवार लवकरच जाहीर करतील अशी शक्यता आहे.
Maharashtra Live News 23rd December 2025 : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एकाच ठिकाणी
