Beed Accident News : बीड – लातूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात वाहनाचा अक्षरश: चक्काचूर झालेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड – लातूर जिल्ह्याच्या सीमेजवळ काल सोमवारी रात्री हा भीषण अपघात झाला आहे. स्कार्पिओ गाडी आणि कारची समोरासमोर धडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कॉर्पिओ गाडीच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
Pune Accident : 15 वर्षांआधी पतीचा करूण अंत, आता शिक्षिकेचा कंटेनरखाली चिरडून मृत्यू, लेक पोरकी; पुण्यातील तो रस्ता ठरला अपघाताचं कारण
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु
घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेऊन कारमधील अडकलेल्या लोकांना बाहेर काढलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्कॉर्पिओ आणि अपघातग्रस्त कार महामार्गावरून बाजूला करण्यात आली. अपघातातील जखमींना तातडीने लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात मयत कोणत्या गावचे आहेत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जखमींना लातूरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहे.
Navi Mumbai News: नवी मुंबईकरांसाठी रेल्वेकडून आणखी एक गिफ्ट! 10 वाढीव लोकल फेऱ्या सुरू; कुठे आणि कसे असेल वेळापत्रक?
बीडमध्ये चाललंय काय?
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणी गावाला आज एक धक्कादायक घटना पाहायला मिळाली. येथील तलावाच्या पाण्यामध्ये एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळल्यानं संपूर्ण पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे. या मृतदेहाची ओळख अद्याप पटू शकलेली नसून, चकलांबा पोलिसांनी नागरिकांना ओळख पटवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना आढळला असून प्राप्त माहितीनुसार, तिंतरवणी येथील तलावाच्या परिसरातील शेतकरी आज आपल्या कामासाठी गेले असता, त्यांना तलावाच्या पृष्ठभागावर काहीतरी तरंगत असल्याचं दिसलं. जवळ जाऊन पाहिल्यास, तो एका व्यक्तीचा मृतदेह असून, पाण्यात राहिल्यामुळे फुगून सडलेल्या आणि पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. मृतदेह पाहताच शेतकऱ्यांनी त्वरीत याची माहिती चकलांबा पोलीस स्टेशनला दिली.
