12th student ends life: रत्नागिरी जिल्ह्यात लांजा येथे एक धक्कादायक घटना घडली. बारावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास झाल्याने एका युवतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. कुटुंबाच्या प्रयत्नांनंतरही उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लांजा पोलीस अधिक तपास करत आहेत.
लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याने व दोन विषयांत नापास झाल्यामुळे या मुलीने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नैराश्यातून हे पाऊल उचलले गेले आहे असे पोलिसांचे म्हणणे आहे. युवतीने आपल्या घरातच किटकनाशक प्राशनकरून आत्महत्या केल्याचे समोर आलं आहे.
Ratnagiri Accident: मित्रांसोबत बाईकवरून जाताना भीषण अपघात; रिक्षाच्या धडकेनंतर तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी
मुलीने किटकनाशक घेतलं आहे हे लक्षात येताच, तिच्या घरच्यांनी तातडीने तिला लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे, पुढील उपचारासाठी तिला रत्नागिरी आणि त्यानंतर कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, पालकांच्या प्रयत्नांना काही यश मिळाले नाही आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
कॉमर्सच्या विद्यार्थिनीचे टोकाचे पाऊल
लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवती इयत्ता बारावीत शिकत होती. परिक्षेचा निकाल लागला तेव्हा ती नापास झाल्याचे समजले. दोन विषयात तिला कमी गुण मिळाल्यामुळे ती नापास झाली होती. अकाऊंट्स आणि इंग्रजी या विषयांमध्ये तिला कमी गुण मिळाले होते. या गोष्टीमुळे ती अक्षरश: खचून गेली होती. ही बाब तिने फार मनाला लावून घेतली होती. याच तनावाखाली एके दिवशी तिने घरात असलेले फवारणीचे औषध प्राशन केले. घरातल्यांनी तिला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले. परंतू, उपचारादरम्यान तिचा करूण अंत झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिल्पा खोत यांच्या आरोपांवर निलेश राणेंचं स्पष्टीकरण, ‘त्या’ कॉल रेकॉर्डिंगवर स्पष्टच बोलले
तरूणीच्या कुटुंबावरही दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात अमृ. क्र. ६४/२०२५,194 भारतीय प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास लांजा पोलीस करत आहेत.
