नागपुरात शालार्थ शिक्षण संघर्ष समितीचं आंदोलन सुरु आहे. शिक्षण समितीच्या अन्नत्याग आंदोलनादरम्यान एका महिला शिक्षिकेची प्रकृती बिघडली आहे. आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपुरात राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधान भवनाबाहेर मोठा गोंधळ उडालेला बघायला मिळतोय. विविध संघटनांकडून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु आहे. यापैकीच शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं आंदोलनाने आता आक्रमक रुप धारण केलं आहे. गेल्या 10 महिन्यांपासून 632 शिक्षकांचे पगार थकवण्यात आल्याचा आरोप आहे. यामुळे शिक्षक समितीकडून विधान भवनाच्या बाहेर अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनादरम्यान एका महिला शिक्षकाची प्रकृती बिघडली आहे. या महिलेला पोलिसांनी रुग्णालयाच्या दिशेला नेलं आहे. दुसरीकडे आंदोलक आपल्या मागण्यांसाठी प्रचंड आक्रमक झालेले आहेत.
शालार्थ शिक्षक संघर्ष समितीने नागपुरात अन्नत्याग आंदोलन केलं. पण आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही म्हणून शिक्षण संघर्ष समितीने नागपूरच्या विधान भवनाबाहेर आपला मोर्चा नेला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महिला शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी आंदोलकांनी प्रचंड आक्रोश केला. एका महिलेची तर अक्षरश: प्रकृती बिघडली.
शालार्थ शिक्षण समितीचं गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनस्थळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील भेट दिली होती. नागपूरच्या यशवंत स्टेडियममध्ये शिक्षण संघर्ष समितीचं पाच दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आपल्या मागण्यांचं सरकार काय करणार? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे. Nagpur Protest : नागपुरात प्रशिक्षणार्थी तरुणांचं आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, वातावरण तापलं “आमच्या दहा महिन्यांपासूनचं रखडलेलं वेतन सरकारने द्यावं. आमच्या सेवेला सरकारने संरक्षण द्यावं. हायकोर्टाच्या निर्णयाचं पालन करावं, एवढ्याच आमच्या रास्त मागण्या आहेत”, अशी मागणी या शिक्षकांची आहे. सरकारी अनुदानित असलेल्या खासगी शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांचं वेतन गेल्या दहा महिन्यांपासून रखडलं आहे. त्यामुळे या शिक्षकांचं आंदोलन सुरु आहे. विधानसभेत IAS तुकाराम मुंढे यांच्या निलंबनाची मागणी, मंत्री Uday Samant म्हणाले, ’20 दिवसांत…’
महिला शिक्षकाची प्रकृती बिघडली
शालार्थ शिक्षक संघर्ष समितीचं आंदोलन सुरु असताना एका महिला शिक्षकाची प्रकृती बिघडली. या महिला शिक्षकाला प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न इतर आंदोलक महिलांकडून करण्यात आला. पण महिलेच्या प्रकृतीत हवी तशी सुधारणा होऊ शकली नाही. आंदोलकांनी महिलेसाठी अनेक प्रयत्न केले. अखेर रुग्णवाहिकेला तिथे बोलावण्यात आलं. तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात नेलं.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा