Jalna News : जालना शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल ॲक्शन मोडवर आले आहेत. काल मध्यवर्ती बस स्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉजमध्ये वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी ८ पुरुष आरोपींना अटक केली आणि ४ पीडित महिलांची सुटका केली.
जालन्याच्या अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली. जालना शहरातील बस स्थानक रोडवरील न्यू शिवगंगा लॉजचा मालक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी लॉजमध्ये बाहेरून महिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला.
Jalna Accident : जेवणाचा डबा आणण्यासाठी जाताना काळाची झडप, भरधाव कारची बाईकला धडक, शेतकऱ्याच्या लेकाला फरफटत नेलं; करुण अंत
या कारवाईत 8 पुरुष आरोपींना ताब्यात घेण्यात आले, असून पोलिसांनी 4 पीडित महिलांची सुटका केलीय. 1) संदीप पांडुरंग राऊत, 2) बाळासाहेब अंकुश जगताप (वय 32 वर्ष), 3) निखिल शेषराव हिवाळे (वय 22 वर्ष), 4) राजू नाना गव्हाड (वय 27 वर्ष), 5) अनिल वामनराव हिवाळे (वय 29 वर्ष), 6) गणेश भाऊसाहेब ओळेकर (वय 30 वर्ष), 7) शिवाजी भाऊराव ओळेकर (वय 30 वर्ष) आणि 8) अमोल जगन जंजाळ (वय 30 वर्ष) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या 8 आरोपींची नावं आहेत.
जालना हादरलं! विवाहित महिलेचा दिवसा ढवळ्या खून, शेतात ओढणीने गळा आवळून… गुन्हेगाराला दोन तासांत अटक, नेमकं काय घडलं?
पोलिसांनी या कारवाईत एकूण 1 लाख 1 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. तर संपूर्ण जालना जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे जे कायद्याच्या विरोधात आहे ,असे नागरिकांना आढळून आल्यास नागरिकांनी कसलेही शंका न बाळगता थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सुद्धा जालना पोलिसांनी केल आहे.
