• Thu. Jun 18th, 2026

    Jalgaon News : शेतकऱ्याच्या पोरीने यंत्रणा झुकवली; रोज ST हुकायची, नंतर तिने धाडस दाखवताच कमाल झाली, नेमकं काय घडलं?

    Jalgaon News : शेतकऱ्याच्या पोरीने यंत्रणा झुकवली; रोज ST हुकायची, नंतर तिने धाडस दाखवताच कमाल झाली, नेमकं काय घडलं?

    Jalgaon Marathi News : शेतकऱ्याची पोरगी शिक्षणासाठी जिद्दीला पेटली, पण बस रोज हुकायची, नंतर तिने धाडस दाखवलं अन् कमाल झाली. जळगावमधील ही तरूणी असून नेमकं घडलं जाणून घ्या.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जळगाव : आमदार प्रताप सरनाईक यांच्या एका ट्विटमुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. जळगाव सीमेवरील निंभोरा गावाजवळ राहणाऱ्या जान्हवी सोपान महाजन या विद्यार्थिनीने शेताच्या बांधावर बस थांबत नसल्याने होणाऱ्या त्रासाबाबत आमदार सरनाईक यांना पत्र लिहिले होते. या पत्राची दखल घेत आमदार सरनाईक यांनी एसटी महामंडळाला आदेश देऊन जान्हवीच्या घराशेजारी बस थांबवण्याची सोय केली आहे. यामुळे जान्हवीसारख्या अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार मिळाला आहे.

    जान्हवी महाजन ही शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील असून, ती जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याच्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. दररोज तिला शेताच्या बांधावरून बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती. बसस्थानक लांब असल्याने अनेकदा तिची बस चुकवत असे, ज्यामुळे तिच्या शिक्षणात अडथळा येत होता. या समस्येवर मात करण्यासाठी जान्हवीने थेट आमदार प्रताप सरनाईक यांना पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या. तिने शेताजवळ बस थांबवण्याची आणि बससेवा वाढवण्याची कळकळीची मागणी केली होती.
    Maharashtra TimesJalgaon News : कपडे सुकवताना चिमुकल्या भाचीला विजेचा धक्का, वाचवायला गेलेल्या मामाचा अन् ताईचा अंत; जळगाव हळहळलं
    आमदार प्रताप सरनाईक यांनी जान्हवीचे पत्र मिळताच त्याची त्वरित दखल घेतली. त्यांनी एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मैंद यांच्यामार्फत छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव विभाग नियंत्रकांना तातडीने आदेश दिले. एसटी अधिकाऱ्यांनी जान्हवीच्या महाविद्यालयात जाऊन तिच्या प्राचार्यांसमोर तिच्याशी संवाद साधला. तसेच, तिच्या घरी भेट देऊन तिची परिस्थिती जाणून घेतली.
    Maharashtra Times‘एकनाथ खडसे सराईत गुन्हेगार’, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
    जान्हवीच्या मागणीनुसार, एसटी अधिकाऱ्यांनी लालपरी (बस) थेट तिच्या शेताच्या बांधावर थांबवण्याचा निर्णय घेतला. या एका सकारात्मक पावलामुळे जान्हवीच्या शिक्षणाच्या स्वप्नांना बळ मिळाले आहे. आमदार सरनाईक यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले असून, राज्यातील खेडोपाड्यातील जान्हवीसारख्या गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे म्हटले आहे. या घटनेमुळे निंभोरा गाव सामाजिक जाणिवेचे प्रतीक ठरले आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. 2020 पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहेत. राजकीय, स्पोर्ट्स, आणि क्राईम या विषयांच्या बातम्यांमध्ये विशेष आवड. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात पत्रकारितेमध्ये आपली पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर थोडक्यात, झी २४ तास, टीव्ही९ मराठी या माध्यमांमध्येही ऑनलाईन टीममध्ये काम केले आहे.… आणखी वाचा