Nashik Crime News : नाशिकमध्ये सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा तपास लागला आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
नाशिक तपोवन महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : तपोवन परिसरातील केवडीबन येथे एका सुटकेसमध्ये गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून संबंधित महिलेची हत्या झाल्याचे आडगाव पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानुसार संशयिताचा शोध सुरू असून, मृत महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर संशयितासमवेत प्रेम संबंध होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘टॅटू’नुसार ओळख पटवण्याचे काम सुरू
कन्नमवार पुलाच्या खाली रस्त्याच्या कडेला मंगळवारी (दि. १६) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास सफाई कर्मचाऱ्यांना काम करत असताना एका सुटकेसमधून उग्र दर्प आला. हा दर्प अतिशय तीव्र असल्याने संशय बळावल्याने या सफाई कर्मचाऱ्यांनी पोलिसांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यानंतर आडगाव पोलिस ठाण्याच्या पथकांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून शहानिशा केली असता सदर सुटकेसमध्ये मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर श्वान पथक, न्यायवैद्यक पथक घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरू झाला होता. याबाबत पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून मृतदेहाच्या हातावर असलेल्या ‘टॅटू’नुसार ओळख पटवण्याचे काम सुरू केले. Nashik Crime: लोंढे, पाटणकरचा कारागृहात उच्छाद; एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांविरुद्ध खोटा अर्ज, प्रकरण काय?
सीसीटीव्हीद्वारे माग
बुधवारी (दि. १७) सकाळी मृत महिलेची ओळख पटल्यानंतर संशयिताचाही माग काढण्यात आला. परिसरातील मोबाइल टॉवर लोकेशनवरून ‘सीडीआर’ आणि ‘एसडीआर’ काढण्यात आले असून, त्याचे विश्लेषण सुरू आहे. यासह २८ सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित वाहनांचा माग काढला जात आहे. मृत महिलेचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून, प्रेम प्रकरणातून तिच्या प्रियकराने खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. Tribal Student School Uniform : अखेर विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार; आश्रमशाळांमध्ये कधीपर्यंत ड्रेस उपलब्ध होणार; मंत्री अशोक उईकेंची माहिती
नेमकी घटना काय?
दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या कन्नमवार पुलाखाली एका काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पिसे आणि पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच फॉरेन्सिक टीम व श्वान पथक दाखल झाले असून, याबाबत अधिक तपास सुरू करण्यात आला. त्यानंतर पोलिसांच्या तपासाता आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा