• Fri. Mar 6th, 2026
    Raigad Crime: खळबळजनक! वाड्याशेजारी आढळली वृद्ध महिलेची बॉडी; दागिने गायब,  नातेवाईकांनी काय सांगितलं?

    Raigad News: महाड तालुक्यातील नाते गावात 76 वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या मृत्यूमागचं गूढ काय यामागचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान, ब़ॉडीवरील दागिने गायब असल्याने…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अमुलकुमार जैन, रायगड: महाड तालुक्यातील नाते गावात एका ७६ वर्षीय वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लीलावती राजाराम बलकावडे (वय ७६) यांचा मृतदेह काल सायंकाळी त्यांच्या वाड्याशेजारी आढळून आला. त्यांच्या अंगावरील दागिने गायब असल्याने हा चोरीच्या उद्देशाने केलेला खून असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे महाड तालुक्यात वाढत्या गुन्हेगारीवर नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

    नाते गावातील लीलावती बलकावडे या वृद्ध महिलेचा मृतदेह काल सायंकाळी त्यांच्या घराशेजारी सापडला. हा प्रकार उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता, त्यांच्या अंगावरील दागिने गायब असल्याचे दिसून आले. यावरून हा खून चोरीच्या उद्देशानेच झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. या गंभीर घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तज्ञांची टीमही घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी पंचनामा केला आणि प्राथमिक तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.

    Maharashtra TimesThane Crime: ढाब्यावर वाद उफाळला अन् काही वेळानंतर…, शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याला हल्लेखोर टोळक्याने जागेवर संपवलं

    महाड ग्रामीण रुग्णालयाबाहेर मृत महिलेच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. त्यांनी पोलिसांना स्पष्टपणे सांगितले की, “दागिने चोरी करून खून करणाऱ्या आरोपीला अटक न झाल्यास आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही.” नातेवाईकांचा ठाम आरोप आहे की, हा खून केवळ चोरीच्या उद्देशानेच झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    गेल्या काही महिन्यांपासून महाड तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. चोरी, दरोडा, महिलांवरील अत्याचार, लहान मुलींवरील बलात्कार, खून आणि खुनाच्या प्रयत्नांसारखे गंभीर गुन्हे वारंवार घडत आहेत. नाते गावात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

    या प्रकरणाचा सखोल तपास महाड शहर पोलीस करत आहेत. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथकही नियुक्त केले आहे. हे पथक सर्व बाजूंनी तपास करत असून लवकरात लवकर आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा