• Sun. Jun 14th, 2026

    एलिव्हेटेड रोड, जुळे बोगदे, 1.2 किमीचा उड्डाणपूल… गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा 2026मध्ये वाहतुकीसाठी सुरू

    एलिव्हेटेड रोड, जुळे बोगदे, 1.2 किमीचा उड्डाणपूल… गोरेगाव मुलुंड लिंक रोडचा पहिला टप्पा 2026मध्ये वाहतुकीसाठी सुरू

    Dindoshi – National Park: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाचा पहिला टप्पा 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात दिंडोशी कोर्टाजवळून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंतचा 1.2 किमी लांबीचा फ्लायओव्हर पूर्ण केला जाईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाचा पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे पोहोचला असून हा टप्पा 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याची तयारी बीएमसीकडून सुरू आहे. बीएमसीकडून हे बांधकाम काही महिन्यांपासून वेगाने सुरू असून, लवकरच पहिल्या टप्प्याचे काम औपचारिकरीत्या पूर्ण होणार आहे.

    गोरेगाव-मुलुंड लिंक रोड हा एकूण 12.2 किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा मार्ग आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, उड्डाणपूल आणि भुयारी रस्ते अशा अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा दुवा गोरेगाव परिसराला दक्षिण मुंबईशी तसेच मुलुंड परिसराला पूर्व मुंबईशी थेट जोडणारा असेल. या प्रकल्पाचे काम चार टप्प्यांमध्ये विभागले गेले असून त्यातील पहिल्या टप्प्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

    Maharashtra Timesदिल्ली अभी दूर नाही! दिल्ली–मुंबई एक्सप्रेसवेमुळे अवघ्या 12 तासांत होणार प्रवास; ‘या’ महत्त्वपूर्ण भागाचे काम अंतिम टप्प्यात

    फेज 1 कुठुन कुठे?

    प्रस्तावित उड्डआ दिंडोशी कोर्टाजवळून सुरू होणार असून तो थेट संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ उतरणार आहे. इथून वाहनचालकांना थेट जुळ्या टनेलच्या प्रवेशद्वारात शिरता येणार आहे. या उड्डाणपूलाची लांबी अंदाजे 1.2 किलोमीटर असून हा फेज-1 च्या शेवटीचा महत्त्वाचा भाग आहे.

    या उड्डाणपुलावर सहा वाहनमार्ग असणार आहेत तसेच उंच प्लॅटफॉर्मवर एक वर्तुळाकार चौक तयार केला जात आहे. याशिवाय पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचारी मार्ग तसेच डेक स्लॅब्स उभारण्याचे कामही करण्यात येत आहे. हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर दिंडोशी आणि SGNP यांना थेट दुवा मिळणार आहे आणि पुढील काळात टनेलचे काम पूर्ण झाल्यावर वाहनांना या पुलावरून थेट भूमिगत बोगद्यांमध्ये प्रवेश करता येईल.

    मे 2026 पर्यंत होणार सुरू

    टनल बोरिंगचे काम 2026 मध्ये सुरू होणार असून हे नागरी बांधकाम पूर्ण करण्यासाठी साधारणपणे एक वर्षाचा कालावधी लागेल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. उड्डाणपूलासाठी एकूण 31 खांब उभारण्यात येणार असून त्यापैकी 27 खांबांचे काम आधीच पूर्ण झाले आहे. रलेल्या चार खांबांचे काम सध्या सुरू आहे. पश्चिमेकडील भाग जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, तर पूर्वेकडील भाग एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण करण्याची तयारी आहे. त्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करून हा संपूर्ण फ्लायओव्हर मे 2026 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचा बीएमसीचा मानस आहे.

    मनोज जरांगे संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भेटले, नवनाथ वाघमारे का संतापले?

    सुमारे 14,000 कोटी रुपये खर्च करून हा GMLR प्रकल्प उभारला जात असून हा मुंबईतील महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जात आहे. पूर्ण प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होईल, असे बीएमसीचे नियोजन आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा