Pune MPSC Student Sagar Pawar ends life : दुपारच्या सुमारास सागरच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्याला अनेकदा आवाज दिला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही
काय आहे प्रकरण?
सागर सुभाष पवार (वय २६, मूळ गाव – मेहेकर, जि. बुलढाणा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सागर मागील तीन-चार वर्षांपासून पुण्यात राहून विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. तो पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या नवी पेठ येथे काही मित्रांसोबत राहत होता.
Crime News : इंजिनिअर पतीचे अनैतिक संबंध, आषाढ उलटला तरी सासरी नेईना; मंदिराजवळ बांगड्या-मोबाईल ठेवला, विवाहितेने आयुष्य संपवलं
शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्याला अनेकदा आवाज दिला, परंतु प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी ही बाब पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दरवाजा उघडला असता सागरने गळफास घेतल्याचे आढळून आले. गेल्या काही काळापासून पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. सागरने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना वाढलेल्या दडपणामुळे आणि नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Pune Crime : बुधवार पेठ परिसरात 19 वर्षीय तरुणीने आयुष्य संपवलं, शेवटच्या चिठ्ठीत मानसी म्हणाली, मला या कामाचा…
नैराश्यात टोकाचं पाऊल?
या प्रकरणाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी सांगितले की, ‘घटनेचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. सागरचे मित्र व परिचित यांची चौकशी केली असता तो काही दिवसांपासून नैराश्यग्रस्त असल्याची माहिती मिळाली आहे. याच नैराश्याच्या अवस्थेत त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याची शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.’ दरम्यान, पोलिसांनी सागरच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली असून, विश्रामबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
