Shiv sena Split News : सहा खासदारांच्या बंडानंतर श्रीकांत शिंदेंचं सूचक वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यांच्या ऑपरेशन टायगरबाबतच्या वक्तव्यानंतर चर्चांना आता आणखी उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांचे वर्धापनदिनाचे भाषण होण्यापूर्वी त्यांनी हे थेट वक्तव्य केले आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील दुसऱ्या मोठ्या फुटीनंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. लोकसभेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या घडामोडींमागे ‘ ऑपरेशन टायगर ‘ असल्याची चर्चा रंगली असतानाच खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक वक्तव्य करत उत्सुकता आणखी वाढवली आहे. आज दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिन मुंबईत आयोजित केलेले आहेत. त्यावेळे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत श्रीकांत शिंदे यांना ‘ऑपरेशन टायगर’बाबत थेट प्रश्न विचारण्यात आला. १६ आणि १७ जून रोजी आपण दिल्लीत नव्हतो तर गावाकडे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ऑपरेशन टायगर यशस्वी झाले का, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. या सर्व खासदारांचा प्रवेश आजच्या सभेतून होणार की नाही याबाबतही स्पष्टता नाही. श्रीकांत शिंदे म्हणाले की, ‘पुढील दोन दिवसांत ऑपरेशन टायगरच्या सर्व गोष्टी ऑन रेकॉर्ड समोर येतील’. त्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना वाढतेय, हेच सर्वात मोठं यश
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त बोलताना श्रीकांत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत असल्याचे सांगितले. राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवसेना पोहोचत असून ज्या भागात पक्षाची ताकद नव्हती, त्या भागांतही संघटना विस्तारत असल्याचा दावा त्यांनी केला.
उबाठाच्या खासदारांनी साथ का सोडली?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मशाल चिन्हावर निवडून आलेल्या खासदारांनी अवघ्या दोन वर्षांत वेगळी भूमिका का घेतली, याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू आहे. बंडखोर खासदार लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत असताना या निर्णयामागील कारणांबाबत अनेक तर्क मांडले जात आहेत.
Shiv Sena News : वर्धापनदिनीच उद्धव ठाकरेंना डबल झटका? सहा खासदारांच्या बंडानंतर आता सातव्याची चर्चा, शिंदेंच्या बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी?
सहा खासदारांच्या बंडामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अशातच श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्यामुळे पुढील दोन दिवसांत आणखी राजकीय घडामोडी कशा घडणार आहेत? याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष शिंदे गटाच्या पुढील हालचालींकडे लागले आहे. तत्पूर्वी आजच्या वर्धापनदिनाच्या सभेत उपमुख्यमंत्री ऑपरेशन टायगरवर काय बोलतात याकडेही सर्वांचं लक्ष आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा