Dr Gauri Palve Death Case : केईएम रुग्णालयात दंत चिकित्सक असलेल्या डॉ. गौरी पालवे यांनी २२ नोव्हेंबर रोजी वरळी येथील बीडीडी नवीन वसाहतीतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती
काय घडलं नेमकं?
केईएम रुग्णालयात दंत चिकित्सक असलेल्या डॉ. गौरी यांनी २२ नोव्हेंबर रोजी वरळी येथील बीडीडी नवीन वसाहतीतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर त्यांच्या पालकांनी केलेल्या आरोपांच्या आधारे वरळी पोलिसांनी पती अनंत याच्यासह त्याचा भाऊ अजय आणि बहीण शीतल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अनंत याला अटक केली. न्यायालयाने अनंत गर्जे याला दिलेली २७ नोव्हेंबरपर्यंतची कोठडी संपल्याने गुरुवारी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी तपासातून समोर आलेली नवीन माहिती न्यायालयात दिली.
Pune Crime : फॉर्च्युनरमध्ये बिझनेसमनचा काटा काढला, सूत्रधार निघाला पुण्याचा माजी नगरसेवक, ताम्हिणी घाटात ट्विस्ट
दोघांच्याही शरीरावर अनेक जखमा
मृत्यूनंतर केलेल्या पाहणीत (इन्क्वेस्ट पंचनामा) डॉ. गौरी यांच्या, तर अटकेनंतर केलेल्या वैद्यकीय चाचणीत आरोपी अनंत यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. तसेच अनंतने डॉ. गौरी यांच्यासोबत मोबाइलद्वारे झालेले संभाषण रेकॉर्ड केले होते. ते हाती लागले असून या संभाषणाची तपासणी केली जाईल. या संवादासह अन्य पुरावे गोळा करून डॉ. गौरी यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या केली गेली, याचा तपास केला जाईल.
Crime News : इंजिनिअर पतीचे अनैतिक संबंध, आषाढ उलटला तरी सासरी नेईना; मंदिराजवळ बांगड्या-मोबाईल ठेवला, विवाहितेने आयुष्य संपवलं
गर्जे भावंडांचा शोध सुरु
याशिवाय गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेल्या अनंत याच्या दोन भावंडांचा शोधही सुरू असून त्यांना अटक करण्यासाठी अनंतच्या पोलिस कोठडीची आवश्यकता आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलाने केला.
