नाशिकच्या इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांचा अपघात झाला आहे. या अपघातात निर्मला गावित गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. निर्मला गावित आपल्या घराबाहेर नातवाला घेऊन फिरत असताना पाठीमागून येणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. या अपधातात त्या गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्या अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अत्यंत भीषण असा हा अपघात होता. या प्रकरणी आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते ते पाहणं महत्त्वाचं आहे.
निर्मला गावित यांचा काल अपघात झाला होता. निर्मला गावित घराच्या बाहेर नातूला फिरवत होत्या. यावेळी रस्त्यावर मागून आलेल्या गाडीने गावित यांना जोराची धडक दिली. गाडीचालक यावरच थांबला नाही. त्याने निर्मला गावित यांना काही फुटापर्यंत फरफटत नेलं. या घटनेत सुदैवाने निर्मला गावित या सुदैवाने बचावल्या आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. काल झालेल्या या भीषण अपघाताच्या घटनेचा थरारक व्हिडिओ आज समोर आला आहे.
अपघातानंतर निर्मला गावित यांची पहिली प्रतिक्रिया
लोकांचा आशीर्वाद माझ्यासोबत होते त्यामुळे या अपघातात आपण बचावल्याची प्रतिक्रिया निर्मला गावित यांनी दिली आहे. “मला काही लक्षातच आलं नाही. मी नातवासोबत वॉक करायला निघाले होते. अचानक मागून धड असा आवाज आला आणि मी बोनेटवर आले. त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये आले. तेवढंच मला आठवतं. घटनेनंतर मला खुर्चीवर बसवले, असं सांगत आहेत. पण मला ते आठवत नाहीय. मी घराजवळच फिरत होते. नातवाचा हात धरला नव्हता. त्यामुळे तो बाजूला होता. आता व्यवस्थित आहे. आज मी खूप रिलॅक्स आहे. काल मला जास्त त्रास होत होता. इथे आल्यानंतर डॉक्टरांनी योग्य उपचार केला”, अशी प्रतिक्रिया निर्मला गावित यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ वाहिनीला दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा