Solapur Two Friends Ends Life: सोलापुरात दोन जीवलग मित्रांनी आपल्या आयुष्याची अखेर केल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एका मित्राने जीव दिला, हे दु:ख सहन न झाल्याने दुसऱ्या मित्रानेही आपला जीव दिला.
अगोदर गोरख भोईने गळफास घेत जीव दिला
गोरखने तानाजी भोई (वय 24 वर्ष) याने अज्ञात कारणावरून शुक्रवारी (21 नोव्हेंबर) रात्री दहा वाजता राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. ही घटना समजल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच गोरख भोई मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर शनिवारी (22 नोव्हेंबर) त्याच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Anant Garje: तिने मला फोन केला, मी पंकजा मुंडेंसोबत रॅलीत होतो; अखेरच्या फोनकॉलवर पत्नी गौरी अनंत गर्जेंना काय म्हणाल्या?
अंत्यविधी सुरू असताना सुरेशने शेतात घेतला गळफास
गोरख भोई याच्या अचानक जाण्याने जीवलग मित्र असलेल्या सुरेश भोई (वय 21 वर्ष) दुःख झाले होते. सुरेशचे आई-वडील वांगी गावातील एका शेतकऱ्याकडे कामाला आहेत. त्याची आई गोरखच्या अंत्यसंस्कारासाठी गेली होती. तेथून तिने फोन करून त्याला घरी येण्यास सांगितलं. मात्र, त्याने घरी न येता शेतातील झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवलं. तो परत आला नाही, म्हणून त्याची आई त्याला शोधायला गेली. तेव्हा शोध घेताना आईला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यानंतर तिने नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. मंद्रुपच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मंद्रुप पोलीस ठाण्यात या दोन्ही दुर्दैवी घटनांची नोंद झाली आहे.
