Eknath Shinde Amit Shah Delhi Meeting : महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याशी सुमारे ५० मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याशी सुमारे ५० मिनिटे चर्चा केली. यावेळी शिवसेना नेत्यांमधील नाराजीला शिंदेंनी वाट मोकळी करून दिल्याचे कळते.
एकनाथ शिंदे शाहांना काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीत विजयी पताका फडकवल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने महायुतीसाठी राज्यात अत्यंत पोषक वातावरण निर्माण झालं आहे. मात्र काही नेत्यांमुळे युतीच्या विजयी घोडदौडीत विनाकारण अडथळे निर्माण होत आहे’ असं एकनाथ शिंदे अमित शहांना म्हणाले. ‘युतीचा धर्म पाळण्यासाठी आम्ही बिहारपर्यंत जातो. या गोष्टीची जाणीव भाजप नेत्यांना करून देण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे’ अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आधी मुंबईतही नाराजी व्यक्त केली होती.
Maharashtra Politics : शिवसेनेचे मंत्री ज्यांच्यामुळे भाजपवर संतापले, ते दहा जण कोण? तिघे तर श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय
अमित शाहांचं शिंदेंना काय उत्तर?
दरम्यान, ‘माझेही महाराष्ट्रातील घडामोडींकडे लक्ष आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मलाही माहिती आहेत. तुम्ही एनडीएमधील प्रमुख नेते आहात, त्यामुळे तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल’ असं अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं. . ‘यातून मार्ग काढून विजयाची घोडदौड कायम ठेवूया’ असे आश्वासन अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना दिले.
Prajakta Patil : उज्ज्वला थिटे अनगरला आल्या, तर मी… राजन पाटलांच्या सूनबाईंची पहिली प्रतिक्रिया, प्राजक्ता म्हणतात, गावातून त्यांना कोणी…
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना सूचना
या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी तातडीने पक्षातील नेते, मंत्री आणि पदाधिकारी यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. मित्रपक्षांतील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची सूत्रांची माहिती आहेत. महायुतीत वितुष्ट येईल अशी कामं करु नका, असंही शिंदेंनी बजावल्याचं बोललं जात आहे.

