एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. मंगेश चव्हाण थोड्या दिवसांत हवेत आला, अशी टीका त्यांनी केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जळगाव : पाचोरा येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी राज्यात सर्वात प्रथम स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केल्याने महायुतीत फूट पडली. दरम्यान स्वबळाच्या निर्णयामुळे पाचोरा नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे भाजपच्या वतीने सुनीता पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांना रिंगणात उतरवले आहे. भाजपच्या वतीने पाचोरा शहरात शक्ती प्रदर्शन करत शनिवारीच सुचेता वाघ यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल केला आहे. दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. यावेळी किशोर पाटील यांनी भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावरही टीका केली.
“शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि युवानेते श्रीकांत शिंदे यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद घेऊन आज पाचोरा शहरात शिवसेनेने स्वतंत्र भूमिका घेतली. ही भूमिका घेतल्यानंतर आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेत 17 नोव्हेंबरला एक नगराध्यक्ष आणि 28 नगरसेवकांचा उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. हे दाखल करताना मला अतिशय आनंदाने सांगावसं वाटत आहे, ज्या पद्धतीने पाचोऱ्यात नागरिकांनी प्रतिसाद दिला तो सर्वांनी पाहिला. आतापर्यंत पाचोऱ्यात अशाप्रकारचं शक्तीप्रदर्शन कधी झालं नाही”, असा दावा किशोर पाटील यांनी केला.
“आम्ही पाचोऱ्यात अनेक विक्रम केले. पाचोऱ्यात दुसरा कुठला आमदार निवडून येत नव्हता. मला या जनतेने तिसऱ्याला निवडून दिलं. मी आज पाचोरा शहरातील जनतेचा आशीर्वाद घेऊन स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. तो स्वतंत्र लढण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे आणि योग्यच राहील. कारण आमच्या रॅलीत असलेली गर्दी. या पाचोरा शहरातील जनता इतिहास करेल. इथे संपूर्ण 28 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष शिवसेनेचे जिंकून येतील”, असादेखील दावा किशोर पाटील यांनी केला.
“मी कॉलेजमध्ये रेसलिंगला होतो. मी कुस्तीपटू आहे. मी कुस्तीपटू असल्यामुळे कुणाला कुठला डाव टाकायचा याची मला पूर्णपणे कल्पना आहे. हे कितीही मल्ल आहे. तरी सगळ्यांना धोबीपछाड पाचोरा शहरातील जनतेच्या आशीर्वादाने करेन. याची मला शंभर टक्के खात्री आहे”, अशी प्रतिक्रिया किशोर पाटील यांनी दिली.
यावेळी किशोर पाटील यांना मंगेश चव्हाण यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. काही दिवसांपूर्वी मंगेश चव्हाण यांनी किशोर पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या टीकेबाबत किशोर पाटील यांना प्रश्न विचारलात असता त्यांनी बोचरी टीका केली. “मंगेश चव्हाण किस गली में गलबला आहे. तो थोड्या दिवसांत हवेत आलेला आहे. त्याची हवा शंभर टक्के निघेल. ही पाचोरा शहरातील आणि भडगाव शहरातील जनता त्याला त्याची जागा दाखवेल”, असा शब्दांत किशोर पाटील यांनी निशाणा साधला.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा