• Sun. Mar 8th, 2026

    Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! उद्या रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार, तिन्ही मार्गांवर ब्लॉक, कसे असेल नियोजन?

    Mumbai Local: मुंबईकरांसाठी महत्त्वाचे! उद्या रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार, तिन्ही मार्गांवर ब्लॉक, कसे असेल नियोजन?

    Mumbai Local Mega Block Update: मुंबईकरांनो, उद्या लोकलने प्रवास करण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर आधी वेळापत्रक तपासा. तिन्ही रेल्वेमार्गांवर उद्या मेगाब्लॉक असणार आहे. कोणत्या लोकल रद्द? पाहा नियोजन

    mumbai local(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : मध्य रेल्वेने रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि पनवेल ते वाशी या दरम्यान मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवरील बोरिवली ते राम मंदिरदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल- दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

    मध्य रेल्वे
    स्थानक – सीएसएमटी ते विद्याविहार
    मार्ग – अप आणि डाउन धीमा
    वेळ – स. १०.५५ ते दु. ३.५५
    परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन धीम्या मार्गावरील लोकल अप आणि डाउन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून काही विलंबाने धावणार आहेत.
    Maharashtra Timesमुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा? आज होणाऱ्या पक्षाच्या शिबिरात घोषणा होण्याची शक्यता
    हार्बर रेल्वे
    स्थानक – पनवेल ते वाशी
    मार्ग – अप आणि डाउन
    वेळ – स. ११.०५ ते दुपारी ४.०५
    परिणाम – सीएसएमटी ते पनवेल आणि ठाणे ते पनवेलदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ब्लॉकवेळेत सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. बेलापूर-उरण लोकल फेऱ्या उपलब्ध राहणार आहेत.
    Maharashtra TimesRamdas Athawale: महायुतीव्यतिरिक्त अन्य पक्षांशी युती करु नका; रामदास आठवलेंची पदाधिकाऱ्यांना सूचना
    पश्चिम रेल्वे
    स्थानक – बोरिवली ते राममंदिर
    मार्ग – अप आणि डाउन जलद
    वेळ – स. १० ते दुपारी ३ पर्यंत
    परिणाम – ब्लॉकवेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

    उगाव स्थानकावर रेल्वेगाडीचे स्वागत
    कोविड काळात बंद असलेल्या रेल्वेला उगाव स्थानकावर थांबा मिळावा यासाठी थेट उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने रेल्वे विभागाला रेल्वे थांबा देण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतरही अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर अखेर शुक्रवारी (दि. १४) उगाव येथे तीन वर्षांनी प्रवासी रेल्वेने थांबा घेतला. निफाड तालुक्यातील मध्य रेल्वेच्या उगाव स्थानकावर देवळाली – भुसावळ व इगतपुरी-भुसावळ या दोन रेल्वेगाड्यांना थांबा जाहीर करण्यात आल्यानंतर उगाव, शिवडी, हिंगलाजनगर ग्रामस्थांतर्फे प्रथमच देवळालीहुन भुसावळकडे जाणाऱ्या मेमू गाडीचे उगाव स्थानकावर सकाळी फटाक्यांच्या आतषबाजीसह फुलांची उधळण करून स्वागत करण्यात आले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा