Alibaug Akshaya Naik Name Announced : अलिबागमध्ये निवडणूक वातावरण तापत असताना भाजप अलिबाग शहराध्यक्ष अॅड. अंकित बंगेरा यांनी मात्र महायुतीत कोणताच तिढा नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, ‘अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढतो आहोत. आमचे उमेदवार निश्चित झाले आहेत. अत्यंत प्रभावी उमेदवार लवकरच जाहीर करू.’
राजकीय वातावरण पालटलं
शेकापकडून झालेली उमेदवारीची घोषणा अनपेक्षित होती. सुरुवातीला शेकापमध्ये अॅड. मानसी म्हात्रे या नावाची चर्चा होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अॅड. कविता ठाकूर आणि भाजपकडून वर्षा शेठ यांच्या नावांची चर्चा रंगत होती. या सर्व समीकरणांमध्ये शेकापने अक्षया नाईक यांची एन्ट्री करून राजकीय वातावरण पूर्णपणे पालटून टाकलं. त्यांच्या नावाच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी आणि भाजपमधील इच्छूक महिलांनी एक एक करून माघार घेण्यास सुरुवात केली आहे.
Alibaug Crime : ये गं पोरी तपासतो; 23 वर्षीय तरुणीला बेडरुममध्ये बोलावलं, 75 वर्षांच्या प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टरचं लज्जास्पद कृत्य
याउलट महायुतीतील पक्ष जसे की, भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अजूनही नगराध्यक्षपदासाठी एकतर्फी किंवा सर्वमान्य उमेदवार निश्चित करू शकलेले नाही. नगरसेवक पदांसाठीही उमेदवार मिळण्यास अडचणी निर्माण झाल्याचं सूत्रांद्वारे स्पष्ट झालं आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना महायुतीतील हा गोंधळ अधिक ठळक दिसू लागला आहे.
Pune Murder Case: पुणे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; फॉर्च्युनर कारमध्ये मित्राला संपवणारा अखेर अटकेत, लोणावळ्यात…
सकारात्मक ऑफर्समुळे…
दरम्यान, महाविकास आघाडीत स्थान न मिळाल्यानं शिवसेना (ठाकरे गट) येथील काही इच्छूकांमध्ये नाराजी पसरली आहे. हे नाराज इच्छूक स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. याला पाहून महायुतीने या नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले असून, त्यांना नगरसेवकपदाबरोबरच नगराध्यक्षपदाची ऑफरही दिल्याची माहिती समोर आली आहे. या सकारात्मक ऑफर्समुळे काही इच्छूक डळमळीत अवस्थेत असून, चर्चा अजून सुरू असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे.

