भाजप आणि ठाकरे गट यांच्यात मुंबईत मोठा राडा होताना दिसत आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून ताज लँड हॉटेलच्या बाहेर आक्रमकपणे आंदोलन केलं जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल परब हे स्वत: या आंदोलनात सहभागी झाले असून ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ताज लँड हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांनी हॉटेलचे गेट बंद केलं आहे. तसेच मुंबई पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. ठाकरे गटाकडून चर्चा करण्यासाठी अनिल परब आले आहेत. त्यांच्यासह इतर पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल आहेत. पण त्यांना हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना रोखलं आहे. त्यामुळे अनिल परब हे आक्रमक झाले आहेत. अनिल परब पोलिसांशी बोलताना नेमकं काय झालं आहे, याची माहिती देताना बघायला मिळाले.
अनिल परब प्रचंड आक्रमक
“या लोकांनी आतमध्ये घुसून जबदरस्तीने कामगारांच्या सह्या घेतलेल्या आहेत. तसेच जबरदस्तीने झेंडा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला मॅनेजमेंटला जाब विचारायला जायचं आहे. ज्यावेळेला आमचा झेंडा त्या लोकांनी कधी लावायला दिला नाही, आज ते लोकं त्यांना झेंडा लावायला जागा देतात. कारण हे लोकं सत्तेत बसले आहेत? म्हणून मला त्यांना आतमध्ये जावून जाब विचारायचा आहे की, अशाप्रकारची कारवाई त्या लोकांनी का केली?”, असा सवाल अनिल परब यांनी केला.
“इतके वर्ष आमची युनियन या ठिकाणी आहे. केवळ सत्तेमधले लोकं आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय. मग हा रस्ता आमचा आहे. हे लोकं कसे बाहेर येतात ते मी बघतो. मी एकतर आतमध्ये सर्वांना घेऊन जाणार. नाहीतर त्या सगळ्यांना इथे बोलवा. रस्त्यावरच फैसला करुन टाकतो”, असं अनिल परब आक्रमकपणे म्हणाले.
नितीश मुख्यमंत्री होते, आहेत आणि…; भाजप मोठा भाऊ ठरताच JDUची पोस्ट अन् अवघ्या काही मिनिटांत…
यावेळी मुंबई पोलिसांनी शिष्टमंडळाला आतमध्ये जाण्याचं आवाहन केलं. पण अनिल परब यांनी विरोध केला. “मी शिष्टमंडळ नाही. माझ्याबरोबर हॉटेलचे जे लोकं आहेत, मी किमान 25 लोकांना माझ्याबरोबर घेऊन जाणार. नाहीतर तुम्ही त्यांना बाहेर घेऊन या. शिष्टमंडळ कशासाठी? काल ते सर्व लोकं आतमध्ये गेले. काल एवढी दादागिरी करन सह्या घेतल्या. त्या लोकांना तुम्ही प्रश्न विचारला का?”, असादेखील सवाल अनिल परब यांनी केला.
बिहारच्या निकालाने महाराष्ट्रात हादरे! ठाकरेंच्या नेत्याने काँग्रेसला घेरलं, ‘ती’ चूक सांगत चांगलंच सुनावलं
“दोन-चार प्रतिनिधींनी काय होणार नाही. काल सर्वांना आतमध्ये प्रवेश देत स्वागत केलं. कारण ते मंत्रिमंडळात बसले आहेत म्हणून, मग मला का आतमध्ये सर्वांसोबत जाऊ देत नाहीत? मला एकट्याला आतमध्ये जायचा प्रश्न नाही. मी किंमान 25 लोकं आतमध्ये घेऊन जा. मला त्यांचं तोंड बघायचं नाही. नाहीतर त्यांना बाहेर बोलवा. त्यांना बाहेर जे सांगायचं आहे ते मी सांगतो. या लोकांच्या मर्जीप्रमाणे चालतं का? आम्ही कुणाचा रस्ता आडवला आहे. त्या लोकांनी आमचे रस्ते बंद केले आहेत. आता गेट कुणी अडवलं आहे?”, असं अनिल परब मुंबई पोलिसांना म्हणाले.

