Metro 1 Ticket on Uber: मुंबईकरांसाठी खुशखबर! आता उबर ॲपवर मेट्रोचे तिकीट मिळणार आहे. अंधेरी-घाटकोपर मार्गावरील प्रवाशांना लांब रांगा टाळून सोयीस्करपणे तिकीट खरेदी करता येईल.
यामुळे मुंबईतील प्रवाशांना आता उबर ॲप न सोडता मेट्रोचे तिकीट खरेदी करता येईल. तिकीट खरेदी करणे सोपे होईल आणि लांब रांगा टाळता येतील. उबर, मुंबई मेट्रो वन आणि ONDC Network यांच्या भागीदारीमुळे हे शक्य झाले आहे.
मुंबईत खाडीवरील पुलामुळे दीड तासाचा प्रवास 10 मिनिटांत होणार, 3900 कोटी खर्च; कसा असेल मार्ग?
लांब रांगा टाळा
या नवीन सुविधेमुळे अंधेरी-घाटकोपर मेट्रो मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तिकीट काढण्यासाठी आता लांब रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. सर्व काम एकाच ॲपवर होणार आहे. उबर इंडियाच्या आणि साउथ आशियाच्या Director Consumer Growth, शिव शैलेन्द्रन यांनी या बद्दल बोलताना सांगितले की, “मुंबईत उबर ॲपवर मेट्रो तिकीट सुविधा आणल्यामुळे प्रवाशांना कमी प्रतीक्षा करावी लागेल, कमी त्रास होईल आणि प्रवासावर अधिक नियंत्रण मिळेल. हे शहरी प्रवास अधिक सोपे आणि अखंड बनवण्याच्या आमच्या प्रयत्नांचा आणखी एक टप्पा आहे, नियोजनापासून ते पेमेंट आणि प्रवासापर्यंत आणि शहराच्या सार्वजनिक वाहतूक नेटवर्कला समर्थन देत आहे.”
ONDC च्या Senior Executive Director, नितीन नायर हे सुद्धा या बद्दल म्हणाले, “उबर ॲपवर ONDC नेटवर्कच्या माध्यमातून मेट्रो तिकीट सुविधा एकत्र करणे हे दाखवते की भारतातील डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कसे दैनंदिन सोयीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरते आहे. दिल्ली आणि चेन्नईनंतर, आम्हाला आनंद आहे की मुंबईकरांसाठी उबरद्वारे ॲपमध्ये तिकीट सुविधा सुरू करत आहोत, जे सार्वजनिक वाहतुकीसाठी खुले डिजिटल पर्यावरण अधिक मजबूत करेल.”
मोनोरेलला चाचणीदरम्यानच अपघात, पत्रकारांनी अधिकाऱ्याला घेरलं, अधिकाऱ्यानं काढला पळ
कशी कराल पेमेंट?
तिकीट खरेदीसाठी पेमेंट फक्त UPI द्वारे करता येईल, ज्यामुळे डिजिटल समावेश आणि भारताच्या डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरला बळकटी मिळेल. लवकरच उबर ॲप प्रवाशांना रिअल-टाइम सेवा अपडेट्स, स्टेशन बद्दल माहिती आणि मार्ग-नियोजन साधनेही उपलब्ध करणार आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोपा आणि कार्यक्षम होईल.

