Sindhudurg Doctor Murder : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आहे. एका डॉक्टरचा मृतदेह आढळला आहे.
आधी कार आता मृतदेह
कणकवली तालुक्यातील खारेपाटणनजीक साळीस्ते येथे महामार्गावर धारधार शस्त्राने खून झालेल्या श्रीनिवास रेड्डी (वय 53, रा. बंगळूर) असं या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणातील पुढील तपासकरिता सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांचं पथक बंगळूरु येथे गेलं आहे. हे पथक परत आल्यानंतरच या सगळ्या प्रकरणावर अधिक माहिती समजू शकणार आहे. दोडामार्ग-तिलारीमध्ये रक्ताने माखलेल्या स्थितीत आढळलेली कार या व्यक्तीची असल्याचं पोलीस तपासात पुढं आलं आहे. साळीस्ते येथे नेऊन गाडीतच त्यांचा खून करण्यात आला आणि गाडी तिलारी धरण पूलनजीक टाकून देण्यात आली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, खून नेमका कोणत्या कारणासाठी केला? कोणी केला? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या सगळ्याचा तपास कणकवली पोलिसांनी युद्धपातळीवर सुरू केला आहे.
घरी परतताना रस्त्यातच अनर्थ घडला, तरुणाचा हृदयद्रावक अंत, मित्र-कुटुंबाचा मन हेलावणारा आक्रोश
कणकवली पोलिसांचं पथक बंगळूरु येथे गेलं आहे. ही कार खून झालेली व्यक्ती श्रीनिवास रेड्डी यांच्या नावाची आहे का? ही व्यक्ती नक्की कोणत्या ठिकाणी काम करत होती? त्यांच्याशी संबंधित कोणकोण आहेत? ते कधीपासून घरातून बाहेर पडले होते? कुणाशी वाद झाला होता का? किंवा अन्य सगळ्या बाबींची माहिती हे पथक जमवत आहे. त्यामुळे या पथकाच्या तपासानंतरच काही गोष्टींवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
PSI Gopal Badane : पंढरपूरहून सोलापूरला गेला, तिथून बीडला आपल्या घरी; पोलीस ठाण्यात सरेंडर होताच गोपाल बदने ढसाढसा रडला
पोलिसांकडून तपासाबाबत कमालीची गुप्तता
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्याची चर्चा आहे. खून झालेले श्रीनिवास रेड्डी हे उच्चशिक्षित डॉक्टर असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून त्यांच्या संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू आहे, परंतु पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू असल्यानं कमालीची गुप्तता पाळली आहे. त्यामुळे या खुनाचं गुढ कायम आहे. रक्तानं माखलेली मिळालेली कार व या व्यक्तीचा मृत्यू या सगळ्यांचा तपास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलिस आणि एलसीबी पोलिस यांचा संयुक्तपणे तपास सुरू आहे.

