• Fri. Sep 18th, 2026

राजधानीत प्रबोधनकार ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 17, 2026

नवी दिल्ली, दि.१७ : समाजसुधारक व आद्य प्रवर्तक प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदन येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, व्यवस्थापक सारिका शेलार, सहाय्यक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना आदरांजली अर्पण केली.

याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.

००००

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed