Pune Crime : पुण्यातील NDA येथील संस्थेमध्ये खळबळजनक घटना घडली आहे. ए़नडीएमध्ये आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महिनाभरात ही दुसरी घटना आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.
आदित्य यादव (वय 18) असे मृत पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोहण्याचा सराव करत असताना त्याचा मृत्यू झाला. एका महिन्या भरतील ही एनडीएमध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे, ज्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी एनडीएमधीलच अंतरिक्ष कुमार या 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता आदित्य यादवच्या मृत्यूमुळे कॅम्पसमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
अंतरिक्ष कुमारसोबत काय घडलेलं?
पहाटेच्या सुमारास 10 ऑक्टोबरला अंतरीक्ष नावाच्या विद्यार्थ्याने आपल्या वसतिगृहाच्या खोलीत बेडशीटच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना एनडीए (NDA) प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित उत्तमनगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासामध्ये पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे, विद्यार्थी मानसिक तणावात होता की शैक्षणिक दबाव होता, किंवा इतर वैयक्तिक कारणांमुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, याचा पोलीस शोध घेत आहेत. या दिशेने तपास करण्यासाठी पोलीस विद्यार्थी मित्र, प्रशिक्षक आणि अधिकाऱ्यांची कसून चौकशी करत आहेत.

