Cm Devendra fadanvis statement: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस आता अल्ट्रा लेफ्टिस्ट झाली आहे, असं वक्तव्य केलं आहे. त्यांनी शहरी नक्षलवादावरही भाष्य केलं आहे.
त्यांनी सांगितले की, “जेन झी अर्थात नव्या पिढीला दिशाभूल करून संविधान आणि संवैधानिक संस्थांवरील विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न शहरी नक्षलवादी करत आहेत. हे सरकारपुढील सर्वात मोठं चॅलेंज आहे. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या ताकदीवर आम्ही या अराजकतावाद्यांचा निश्चित पराभव करू. बंदुकीच्या नक्षलवादात शत्रू कोण हे स्पष्ट असते, पण शहरी नक्षलवाद बिनचेहऱ्याचा आहे. हे लोक वेगवेगळ्या रूपात समाजात वावरतात आणि विषारी विचार पेरतात. त्यांच्या विरोधात लढा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.”
अलिबागमध्ये भररस्त्यात साप आणि मुंगूस भिडले, थरारक लढाई पाहून प्रवासी स्तब्ध; काहीवेळ वाहतूक ठप्पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि खासदार राहुल गांधी यांच्यावरही यावेळी जोरदार टीका केली. “आमच्या विरोधकांमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, परंतु आज ती पक्षसंस्था ‘अल्ट्रा लेफ्टिस्ट’ विचारसरणीने ग्रस्त झाली आहे. इंदिरा गांधींच्या काळातही असे घडले नव्हते. मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस फक्त ‘डिस्ट्रक्टिव’ म्हणजे विध्वंसक मुद्दे उचलत आहे. ते सरकारवर नव्हे तर संविधानिक संस्थांवर हल्ला करत आहेत, जे लोकशाहीसाठी अधिक घातक आहे,” असा आरोप त्यांनी केला.
“आज भारताच्या राजकारणात विरोधकांनी स्वतःचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. देशाच्या प्रगतीच्या वाटचालीत बांधणीकारक भूमिका घेण्याऐवजी विरोधक फूट पाडणारी भूमिका घेत आहेत.” असेही फडणवीस म्हणाले.
जातीय राजकारणावर भाष्य करताना त्यांनी म्हटले, “जात जनतेच्या मनात नाही, ती नेत्यांच्या मनात असते. निवडणुका आल्या की त्यांची जात बाहेर पडते. पण जनता आता जागृत आणि समजूतदार झाली आहे. म्हणूनच जनतेने नेहमीच मला पाठिंबा दिला आहे.”
सगळं लुटलं, स्वप्न उद्ध्वस्त… सराफाच्या फसवणुकीनं महिलांच्या डोळ्यात अश्रू!
मतदार याद्यांतील त्रुटींबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, “मतदार याद्यांमधील घोळ हे काही आजचे प्रकरण नाही. मी 2012 पासून या संदर्भात उच्च न्यायालयात याचिकाकर्ता आहे. त्याचा अजून निकाल लागला नाही, हे ग्रामीण भागात नाही तर शहरी भागात जास्त आहे. जर दोन तीन ठिकाणी नाव असताना एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदान केले हे विरोधकांनी दाखवून द्यावे, कारण असे घडत नाही. आमच्याकडे आमचे विरोधक ज्या मतांवर निवडणून येतात, त्या घटकांच्या मतदार याद्या कशा सदोष आहेत, त्याचे पुरावे आमच्याकडे आहे. योग्यवेळी आम्ही त्या याद्या समोर आणू”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

