महायुतीमधील सर्व मंत्र्यांच्या कामाचे ऑडिट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात गुजरातसारखा मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची माहिती समोर येत आहे. महायुती सरकारची वर्षपूर्ती झाल्यानंतर महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. महायुतीमधील सर्व मंत्र्यांच्या कामांचे ऑडिट होणार असल्याची चर्चा आहे. याबाबत एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे. मंत्र्यांच्या कामांच्या ऑडिटमधून कोणत्या मंत्र्याने काय-काय कामे केली, याची माहिती घेतली जाणार आहे. असं असलं तरी गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होणार नाही, अशी देखील माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पा मारत असताना याबाबतच्या वृत्तांचं खंडन केलं आहे. मंत्र्यांच्या कामांचं ऑडिट होईल म्हणजे केवळ मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाईल. तूर्तास तरी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कोणताही विचार नाही. याउलट सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. त्यांच्याकडे आमचं लक्ष आहे. त्यामुळे विस्तार होईल किंवा सध्याच्या मंत्र्यांना हटवण्याबाबत कोणतीही परिस्थिती नाही. आमच्यासाठी सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात फेरबदलाची कोणतीही शक्यता नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत एकत्र लढणार, फडणवीस यांचं वक्तव्य
दरम्यान, “आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. पण “पुणे, पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार”, असंही फडणवीस म्हणाले आहेत. तसेच “ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का? याची चाचपणी होईल. विरोधकांना जिथे फायदा होईल तिथे महायुती म्हणून एकत्र लढू”, असंही फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, ठाण्यात एकत्र लढायचं की स्वबळावर लढायचं याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निर्णय घेणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दुसरीकडे महायुतीत अनेक ठिकाणी मतभेद पहायला मिळत आहेत. हे मतभेद पाहता आगामी निवडणुकीला महायुतीचे नेते कसे सामोरे जातात? ते पाहणं देखील महत्त्वाचे आहे. स्थानिक पातळीवर सुरु असलेले मतभेद हे टोकाला जाऊ नयेत, यासाठी महायुतीच्या घटक पक्षांचे ज्येष्ठ नेते काय-काय पावलं उचलतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा