Raigad News : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीच्या सणाला कर्मचाऱ्याने मेव्हण्याच्या घरी जात जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेने खळबळ उडाली आहे.
या चौकशी प्रकरणात वरुडे यांच्यावर मानसिक तणाव वाढत चालल्याची देखील चर्चा सुरू होती. २० ऑक्टोबर रोजी, त्यांनी विद्यानगर येथे आपल्या मेव्हण्याच्या घरी असताना विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे त्यांना उलटी होऊ लागली व नातेवाईकांनी तातडीने अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच दीपावली च्या दिवशी सोमवार दिनांक २०ऑक्टोबर रोजी सकाळी ६:३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
फेसबुकवरील मित्राचा विवाहितेवर वारंवार अत्याचार, शारीरिक संबंधांचे व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणारा आरोपी जेरबंद
या घटनेबाबत त्यांची पत्नी अश्विनी वरुडे (वय ४७) यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस तपास सुरू आहे. ही आत्महत्या नेमकी आर्थिक अपहारप्रकरणातील दबावामुळे झाली की इतर कोणत्यातरी वैयक्तिक कारणामुळे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही याचे कारण येणाऱ्या आगामी काळात स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत संशयाची सुई पुन्हा एकदा फिरू लागली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
क्रूरतेचा कळस! निराधार योजनेचं अनुदान मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंध महिलेचा कारकुनाकडून विनयभंग
या आत्महत्येमुळे अपहार प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

