Mumbai Metro – 3 : मुंबई मेट्रो-3 च्या भुयारी मार्गावर नेटवर्क नसल्याने फोन लागत नसल्याची, तसंच डेटा वापरता येत नसल्याची तक्रार होती. ही तक्रार आता दूर होणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने प्रवाशांसाठी मोफत वाय-फाय सुविधा सुरू केली असून ती कशी वापरता येणार याबाबत माहिती दिली आहे.
ॲक्वा लाइनमध्ये प्रवाशांना मिळणार वायफाय सुविधा
मेट्रो 3 ‘ॲक्वा लाइन’ म्हणून ओळखली जाणारी ही देशातील सर्वाधिक लांबीची भुयारी मेट्रो आहे. मार्गिकेचा विज्ञान केंद्र ते कफ परेड हा 11 स्टेशनचा शेवटचा टप्पा मागील गुरुवारपासून प्रवाशांसाठी सुरू झाला. त्यानंतर मार्गिकेवरील दररोजची प्रवासीसंख्या दुपटीहून अधिक होऊन ती दीड लाखावर गेली आहे. या प्रवाशांना आता वाय-फाय सुविधाही मिळणार आहे.
Metro 2 B : मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार; नवी मेट्रो लवकरच सेवेत, मानखुर्द, गोवंडी, चेंबूर… कुठे असणार स्टेशन्स? मार्ग कसा?
मेट्रोकनेक्टर’ या ॲपद्वारे वापरता येणार वायफाय
‘एमएमआरसीएल’ने वायफायची ही घोषणा केली आहे. त्यानुसार ‘एमएमआरसीएल’ च्या ‘मेट्रोकनेक्टर’ या ॲपद्वारे वाय-फायचा वापर करता येणार आहे. हे ॲप डाउनलोड करून त्यात नोंदणी करावी. त्यानंतर आपल्या मोबाइल फोनच्या वाय-फाय सेटिंगमध्ये ‘मेट्रो कनेक्ट 3’ या नावाने वाय-फाय सुरू केल्यास प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. स्टेशनमध्ये प्रवेश करण्याआधी हे वाय-फाय सुरू करावं, असं आवाहन कंपनीने केलं आहे. याद्वारे डेटा वापरता येईल. तसंच कॉल करणंही प्रवाशांना शक्य होणार आहे. दरम्यान, या मार्गिकेतील नवी स्टेशन्स शुक्रवारी रात्रीपर्यंत ‘मुंबई वन’ ॲपवर उपलब्ध नव्हती. ‘मेट्रोकनेक्ट 3’ वर ही स्टेशन्स आली होती.
Thane Metro Trial Run LIVE : ठाणेकरांचे स्वप्न साकार, मेट्रो ४ ची ट्रायल; CM Fadnavis-Shinde LIVE
प्रवासी संख्येचा नवा उच्चांक
भुयारी मेट्रो मार्गिकने पहिल्या दिवशी, गुरुवारी 1.56 लाख प्रवासीसंख्येचा टप्पा गाठला. हा उच्चांक दुसऱ्या दिवशी, शुक्रवारी रात्री 9 वाजता मोडला गेला. रात्री 9 वाजेपर्यंत 1 लाख 59 हजार 105 प्रवाशांनी या मार्गिकवरून प्रवास केला. सायंकाळी 6 वाजता प्रवासीसंख्या 1 लाख 11 हजार 696 होती. त्यानतर अवघ्या तीन तासांत 47 हजार 409 प्रवाशांनी या मार्गिकेचा वापर केला. दक्षिण मुंबईतील नवी स्थानके जोडली गेल्याचा सकारात्मक परिणाम मार्गिकेवर दिसून येत आहे.

