Sangli Murder Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच सांगलीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारु पिण्यावरुन मित्रांनी मिळून आपल्या मित्राचीच दगडाने ठेचून हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं सांगली जिल्हा हादरला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मृत रोहित आवळे हा आपल्या कुटुंबियांसह माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर झोपडपट्टीमध्ये राहत होता. काल शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मृत रोहित आवळे हा त्याच्या मित्रांसोबत बाहेर गेला होता. वसंतदादा औद्योगिक वसाहत परिसरातील एका बंद पडलेल्या इमारतीत रोहित आणि त्याचे मित्र हे दारू पीत बसले होते. यावेळी दारू पिण्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरु झाला. यावेळी चिडलेल्या त्याच्या मित्रांनी दगडाने ठेचून रोहित याची निर्घृण हत्या करत घटनास्थळावरुन पलायन केलं. घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
आई ऑफिसला जाताच चिमुरडा घरुन गुपचूप निघाला, शोधाशोध सोशल मीडियावर पोहोचली, कशी झाली मायलेकराची पुनर्भेट?
पोटच्या पोराने आईला संपवलं
अशीच एक घटना सांगलीत काल घडलीय. दिवाळी सणाच्या तोंडावर धक्कादायक घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे. तासगावातील इंदिरानगर झोपडपट्टी येथे दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, या क्षुल्लक कारणावरून मुलानेच जन्मदात्या आईची तलवारीने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयानं दोन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. मृत महिलेचं नाव शांताबाई चरण पवार (वय 70, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, तासगाव) असं असून, याप्रकरणी महिलेचा मोठा मुलगा तथा आरोपीचा मोठा भाऊ उपकाऱ्या चरण पवार यांनी आपल्या भावाविरुद्ध फिर्याद दिली आहे. आरोपीचं नाव जगणु उर्फ जगण्या चरण पवार (वय 45) असं आहे.

