• Tue. Sep 8th, 2026

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांची सदिच्छा भेट – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Oct 17, 2025
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांची सदिच्छा भेट – महासंवाद




मुंबई/कोल्हापूर, दि. १७: हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार जॅकी श्रॉफ यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली. थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवंशिक गंभीर आजाराविषयी श्रॉफ हे संवेदनशील असून त्याबाबत समाजामध्ये प्रबोधन करण्याच्या कामात शासनास सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अभिनेते श्रॉफ मागील काही वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थॅलेसेमिया विषयावर सातत्याने काम करत आहेत. या आजारावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटक, सेवाभावी संस्था, संघटना, प्रतिष्ठित नागरिक व डॉक्टर्सनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र शासनाच्या ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून अभिनेते श्रॉफ यांनी शासनास सहकार्य करण्याबाबत यावेळी अनौपचारिक चर्चा झाली. या आजाराविषयी अधिक चांगली जनजागृती आणि या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.

या भेटीवेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, मंगेश चिवटे, गजेन्द्रराज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed