Nashik News: नाशिकमध्ये माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या टोलेजंग अनधिकृत इमारतीवर मनपा अतिक्रमण विभागाने हातोडा चालवला. सातपूर गोळीबार प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या लोंढे आणि पुत्र दीपक लोंढे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.
माजी नगरसेवक प्रकाश लोंढे व त्यांचा पुत्र दीपक लोंढे यांच्यावर सातपूर येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात मुख्य संशयित म्हणून ताब्यात घेत कार्यवाही करण्यात आली आहे. सध्या ते दोघेही पोलिस कस्टडी मध्ये आहेत. त्यांच्या ITI सिग्नल – अंबड रोड येथील संपर्क कार्यालयाची झडती घेतली असता तेथे एक भुयार मिळून आले होते. या भुयारात पोलिसांना २ कुऱ्हाडी आणि एक चाकू मिळून आला आहे. गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी या भुयाराचा वापर केला जात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
IND vs AUS: कॅप्टन्सी गेल्यावर रोहित शर्मासमोर प्रथमच आले गौतम गंभीर अन् काय घडलं, जाणून घ्या..
त्यानंतर सध्या अतिक्रमणाची कार्यवाही सुरू असलेल्या अनधिकृत इमारतीला मनपाकडून नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसला कुठलेही उत्तर न आल्याने अखेर आज मनपा अतिक्रमण विभागाकडून सदर टोलेजंग इमारतीवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. एकूणच जर बघितले तर वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी शहर पोलिसांकडून कडक पाऊले उचलली जात असताना ताब्यात असलेल्या संशयितांच्या अनधिकृत बांधकामावर देखील आता मनपा अतिक्रमण विभागाकडून कार्यवाही केली जात आहे.
तर लोंढे यांच्याकडून अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या इमारतीला आज जमीनदोस्त केले जाते आहे. त्यातच येथील आजुबाजूची अनेक घरे देखील अनधिकृत असून त्यांना देखील नोटीस बजावण्यात येणार असल्याचे मनपा उपआयुक्त स्मिता झगडे यांनी म्हटले आहे. एकूणच आजची कारवाई पाहता नाशिकमध्ये देखील आता गुन्हेगारांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री “योगी आदित्यनाथ यांचा पॅटर्न” राबवला जात आहे की काय ?अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.

