सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके हे वर्धा दौऱ्यावर आले असता त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाचा निषेध व्यक्त करताना अभिजीत दिपकेंनी सरकारवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली तरी सरकार ऐकायला तयार नाही, मात्र MPSC अध्यक्षांचा राजीनामा झालाच पाहिजे, असे दिपके यांनी म्हटले.