Samruddhi Mahamarg Link to Thane : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून ठाण्यात आणि पुढे मुंबईत थेट प्रवेश करता येणार आहे. या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. या मार्गामुळे दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार आहे.
(भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान उन्नत मार्ग
आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात MMRDA ने (भिवंडी) आमने ते (ठाणे) साकेत दरम्यान 29.3 किमी लांबीचा उन्नत मार्ग, एलिवेटेड ब्रिज उभारण्याची योजना आखली आहे. या उन्नत मार्गासाठी 6 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. भिवंडी येथील आमने ते ठाणे येथील साकेत या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलामुळे समृद्धी महामार्गावरुन प्रवाशांना विनाअडथळा थेट मुंबईत प्रवेश करता येणार आहे. नव्या आमने ते साकेत या मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी करण्यास मदत होईल.
मीरा-भाईंदर ते नायगावपर्यंत मेट्रो कामाला विलंब, वसई खाडीवर डबल-डेकर पूल, MMRDA ची योजना
ठाणे ते मुंबई प्रवास सुखकर होणार
सध्या भिवंडीतून आमने ते ठाणे या प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे जवळपास दीड ते दोन तास लागतात. तसंच ठाण्यातून मुंबईच्या दिशेने जातानाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए इस्टर्न फ्री वेचा विस्तार करणार आहे. घाटकोपर येथील छेडानगर ते आनंदनगरदरम्यान हा फ्री वेचा विस्तार केला जाणार आहे. या मार्गाचं कामही सुरू करण्यात आलं आहे. छेडानगर ते आनंदनगर हा मार्ग 12.955 किमी लांबीचा असेल. तसंच या मार्गावर सहा लेन असतील. या कामासाठी 2683 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसंच आनंदनगर ते साकेत (ठाणे) या मार्गावरही उन्नत मार्गाचं काम सुरू आहे. हा मार्ग 8.24 किमी लांबीचा असून यासाठी 1874 कोटी खर्च येईल.
Devendra Fadnavis | एखादा महामार्ग जेव्हा बनतो तेव्हा विकासाची दालनं खुली करतो
दक्षिण मुंबईत पोहोचणं सोपं होणार
हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरुन विनाअडथळा मुंबईत जाता येईल. भिवंडी-आमने ते ठाणे-साकेत, साकेत ते आनंदनगर आणि आनंदनगर – छेडानगर-घाटकोपर आणि पुढे सध्याच्या इस्टर्न फ्री वेने दक्षिण मुंबईत पोहोचणं अतिशय सुलभ होईल.

