Nagpur Heavy Rain : नागपुरात अतिवृष्टीने अतिवृष्टीने, पुरामुळे अनेक गावं जलमय झाली असून ८ हजारहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. अनेक घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. तसंच पुरात अनेक जनावरं वाहून गेली असून अनेक दगावली आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये यंदाचा पाऊस जनतेसाठी संकट घेऊन आला. अतिवृष्टी आणि नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेकडो गावे जलमय झाली. आपत्तीमुळे नागरिकांचे मानसिक आणि आर्थिक दोन्ही नुकसान झाले आहे. घरांसह जनावरांचे गोठे, शेतीमाल आणि घरगुती वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या एकूण नुकसानीचे चित्र भयावह आहे. ६९ नागरिकांचा मृत्यू, तर ३२ जण जखमी झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. एवढेच नाही तर जनावरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, १२७ जनावरे दगावली आहेत. याशिवाय ८७८ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनाम्याची प्रक्रिया सुरू असून मदतीसाठी अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात येईल, असे काटोलचे तहसीलदार राजू रणवीर यांनी सांगितले.
Maharashtra Weather Update: नवरात्रीत मेघगर्जना! २५ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, IMDकडून अलर्ट जारी
शेतीवरही या आपत्तीचा मोठा परिणाम झाला आहे. अतिवृष्टीमुळे शेतीतील पिके पाण्याखाली गेली असून, ६९ हजार ६२७ शेतकरी बाधित झाल्याचे अहवालात नमूद आहे. या शेतकऱ्यांना केवळ आर्थिक तोटा नाही, तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या उपजीविकेवर संकट ओढवले आहे. विभागात ४३ हजारांपेक्षा अधिक तर नागपूर जिल्ह्यातील ६ हजार १२८ हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले. शासकीय निकषानुसार मदत दिली जाईल, असे प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय येळे यांनी सांगितले.
अतिवृष्टीमुळे परभणीत खरिपाच्या पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांना सरसकट मदत करा, संजय जाधव यांची मागणी
‘ओला दुष्काळ जाहीर करा’
नैसर्गिक आपत्तीसमोर माणसाची असहाय्यता पुन्हा एकदा दिसून आली आहे. हजारो कुटुंबांना आपले निवाऱ्याचे छप्पर गमवावे लागले असून पुढे आयुष्य उभारणे ही त्यांच्यासाठी मोठी कसोटी ठरणार आहे. ‘विद्यमान ओल्या दुष्काळाचे चित्र आहे. सोयाबीनचे पीक हातात येणार नाही. जिथे पाणी साचले नाही तिथेही नुकसान झाले. ढगाळ वातावरणामुळे कापसाला बोंड आले नाही. सरकारने आता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून चार हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी. गेल्यावर्षी तीन हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी १३ हजार ६०० रुपयांची मदत देऊ केली होती’, असे कृषिअभ्यासक विजय जावंधिया यांनी सांगितले.

