• Tue. Jun 16th, 2026

    Nashik News : शाळांमध्ये उत्सवी प्रवेश, पण आदिवासींना नाही गणवेश! फाटक्या कपड्यांमध्ये पोरांचं स्वागत, आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित; जबाबदार कोण?

    Nashik News : शाळांमध्ये उत्सवी प्रवेश, पण आदिवासींना नाही गणवेश! फाटक्या कपड्यांमध्ये पोरांचं स्वागत, आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित; जबाबदार कोण?

    Nashik News : ठेकेदार प्रेमी बाबूंमुळे सव्वा दोन लाख आदिवासी विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. अंध, अपंगाबाबतचे शासन धोरण अन सर्वोच्च न्यायालयाचा आदेश देखील धुडकावण्यात आला आहे.

    आदिवासी विद्यार्थ्यांना गणवेश नाही (फाईल फोटो)(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    विनोद पाटील,नाशिक : आदिवासी मंत्रालयातील बड्या बाबूंनी ठेकेदारांवरील त्यांच्या ‘विशेष प्रेमा’मुळे राज्यातील सव्वादोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना सलग दुसऱ्या वर्षी शालेय गणवेश मिळू दिले नसल्याची धक्कादायक व संतापजनक बाब समोर आली आहे. अंध व अपंगांनी तयार केलेल्या या गणवेशांचा पुरवठा रोखण्यासाठी या बाबूंनी थेट सर्वोच्च न्यायालय व शासकीय आदेशाचीही पायमल्ली केल्याचे समोर आले आहे. आदिवासींचे हित जपण्याऐवजी ठेकेदारांसाठी नियम मोडणाऱ्या या बाबूंमुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर सलग दुसऱ्या वर्षीचा प्रवेशोत्सव आज (दि. १५) फाटक्या कपड्यातच साजरा करण्याची वेळ आली आहे. ठेकेदार हिताय धोरणामुळे फाटक्या कपड्यातील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची नामुष्की आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके यांच्यावर ओढावली आहे.

    संस्थेला उच्च न्यायालयात आव्हान

    आदिवासी विकास विभागाअंतर्गत राज्यात ४९७ शासकीय आश्रमशाळांतील सव्वादोन लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी दोन शालेय गणवेश, नाइट ड्रेस, वह्या, पुस्तके, दप्तर, बूट या वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. गणवेश व शालेय साहित्य शाळेच्या पहिल्याच दिवशी देणे अपेक्षित असते. परंतु, लोकप्रतिनिधी व मंत्रालयातील सरकारी बाबूंचा जीव विद्यार्थ्यांपेक्षा ठेकेदारांमध्येच अधिक अडकत असल्याने या गणवेश खरेदीला दरवर्षी भ्रष्टाचाराचे ग्रहण लागते. या पार्श्वभूमीवर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात सोलापूर स्थित अंध व अपंगांसाठी कार्यरत असलेल्या जगदंबा रेडिमेड ड्रेसेस या संस्थेकडून (सामाजिक न्याय विभाग नोंदणी- क्र.एसयुआर/ एनएसआर/पीआरडी/ ६६९/२०२३) शासनाच्या थेट दरनिश्चिती धोरणानुसार गणवेश व नाइट ड्रेसची ११५ कोटींची खरेदी करण्यात आली. परंतु, त्यामुळे कासावीस झालेल्या बड्या ठेकेदारांच्या लॉबीने २०२५-२६ मध्ये या संस्थेला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
    Maharashtra TimesPune News : पुणेकरांनो आजपासून पाणीपुरवठा दिवसाआड होणार! पाणीकपातीचं मोठं आव्हान, पाहा वेळापत्रक

    फाटक्या कपड्यातच विद्यार्थ्यांचे स्वागत

    या संस्थेला एक कोटीपेक्षा अधिक रुपयांचे काम विनानिविदा दिले जाऊ शकत नाही, असा दावा करण्यात आला. परंतु, उच्च न्यायालयाने ८ ऑगस्ट २०२५ रोजी हा दावा फेटाळून लावला. तरी आदिवासी विभागाने या संस्थेचे काम कायम ठेवण्याऐवजी नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली. त्याला संस्थेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही न्यायालयीन लढाई वर्षभर सुरू राहिल्याने गेल्या वर्षी विद्यार्थ्यांना जुन्या व फाटक्या गणवेशांवर शैक्षणिक वर्ष पूर्ण करण्याची वेळ आली. आता यंदाही त्याची पुनरावृत्ती होत असून, सरकारी अधिकारी व ठेकेदारांच्या अभद्र युतीमुळे सलग दुसऱ्या वर्षी आदिवासी विद्यार्थी गणवेशांपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे मंत्री डॉ. वुईके आज फाटक्या कपड्यातच विद्यार्थ्यांचे स्वागत करणार असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

    सर्वोच्च आदेशालाही केराची टोपली

    विभागाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात संस्थेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विक्रम नाथ व संदीप मेहता यांच्या पीठाने २१ मे २०२६ रोजी संबंधित संस्थेकडून शासनाच्या धोरणानुसार आश्रमशाळा व एकलव्याच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश व नाइट ड्रेस खरेदी करण्याचे आदेश देत, विभागाची निविदा प्रक्रिया रद्द केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अपमानित झालेल्या बाबूंनी त्यालाही फाटे फोडले. आश्रमशाळांमधील सव्वादोन लाख विद्यार्थ्यांऐवजी ‘एकलव्य’च्या ११ हजार विद्यार्थ्यांच्या गणवेश पुरवठ्याचे आदेश देत पळवाट काढली.परिणामी, गेल्या तीन आठवड्यांत आश्रमशाळांबाबत निर्णय घेण्याबाबत आदिवासी विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने विद्यार्थी वंचित राहिलेत.
    Maharashtra TimesOBC Reservation: ओबीसींच्या आरक्षणाला कात्री? अपूर्णांकातील जागा मोजण्याच्या नव्या नियमाने समाजात संताप

    ठेकेदारांसाठी शासन धोरणालाच फाटा

    वंचित घटकांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने अंध व अपंग बांधवांसाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या १ डिसेंबर २०१६ च्या आदेशानुसार स्वतंत्र धोरण असते. त्यात या संस्थांसाठी राखीव साहित्य विनानिविदा काम देण्याची तरतूद असते. त्यानुसारच सन २०२४-२५ मध्ये आदिवासी विभागाने संबंधित संस्थेकडून ११५ कोटींचे गणवेश, नाइट ड्रेस खरेदी केले. तर आदिवासी विभागाने उद्योग, ऊर्जा, कामगार विभागाच्या धोरणानुसार गणवेशासारख्या राखीव वस्तू वगळूनच अन्य साहित्याची खरेदी करावी, असा आदेश (क्र. ११२५, प्र. क. १११, का. १३) २१ मे २०२५ रोजी काढला आहे. तरीही सरकारी बाबूंनी ठेकेदारांवरील प्रेमापोटी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात संबंधित संस्थेला काम मिळू नये, यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यामुळे संस्थेला आपल्या हक्कांसाठी थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा द्यावा लागला.

    ‘कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी’

    ‘आदिवासी विभागातील अधिकारी व लोकप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याऐवजी भांडवलदार ठेकेदारांसाठी काम करतात.विद्यार्थ्यांना गणवेशाच्या हक्कापासून वंचित ठेवण्यासाठी शासकीय आदेश, सर्वोच्च न्यायालयाचाही आदेश धुडकावतात. हा आदिवासींवरील अन्याय असून अशा लोकांवर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी’, असं आदिवासी बचाओ आंदोलनाचे समन्वयक रविंद्र तळपे यांनी म्हटलं आहे.
    Maharashtra TimesPune International Airport: पुनर्बांधणीच्या कामांदरम्यान पुणे विमानतळ सुरू राहणार, जुनं टर्मिनलही लवकरच खुलं करणार; प्रवाशांना मोठा फायदा होणार

    ‘आदेशाचा अभ्यास केला जात’

    ‘गणवेश खरेदीचा वाद हा न्यायालयात असल्यामुळे गेल्या वर्षी गणवेश, नाईट ड्रेस देता आले नाहीत. आताही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अभ्यास केला जात असून लवकरात लवकर गणवेश देण्याचे नियोजन सुरू आहे’, असं आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी म्हटलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा