Chhatrapati Sambhajinagar Crime : हर्सूल कारागृहामध्ये ५ कैद्यांचा तुरुंगात राडा,अधिकार्यावर हल्ला
हर्सूल कारागृहातील यार्ड मध्ये राऊंड घेत असताना हत्या व अपहरणातील कैदी संशयास्पद रित्या आढळून आले होते त्या पाच कैद्यांनी चांगलाच राडा केला. तुरुंग अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यावर या कैद्यांनी हल्ला केला. हे सर्व आरोपी हत्या, अपहरण सारख्या विविध गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत. कारागृहामध्ये हे सर्वजण संशयितरित्या आढळून आल्यानंतर त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे धारदार पत्राचा तुकडा आढळून आला. याबाबत विचारपूस केली असता त्यांनी गोंधळ घालत अधिकाऱ्यावर हल्ला चढवला.
