Washim Viral Video : वाशिममध्ये दोन वर्षांच्या शांभवी चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बाप्पाला मोदक भरवलेल्या शांभवीचे प्रेम पाहून कुटुंबीय भावूक झाले. बाप्पाला निरोप देताना तिला रडू आवरलं नाही, तिला पाहून बाप्पालाही पाय निघाला नसावा.
गणेश विसर्जनानंतर चिमुकली भावुक, बाप्पाला परत आणा म्हणत ढसाढसा रडली…व्हिडिओ व्हायरल
विसर्जनापूर्वी शांभवीने प्रेमाने बाप्पाला मोदक वाहिला होता. त्या प्रेमाचीच आठवण तिच्या मनात जिवंत होती. मखर रिकामे पाहताच ती बोबड्या आवाजात रडू लागली. आई-वडिलांनी व भावाने तिला समजावत सांगितले, “बाप्पा पुढच्या वर्षी परत येतील.” तरीही तिच्या निरागसतेतून उमटणारे ममत्व पाहून उपस्थित सर्व जण भावूक झाले आणि डोळ्यांत पाणी आले.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 50 हजार उकळले, ब्लॅकमेलिंगला कंटाळत तरुणानं…
ही घटना गणेशोत्सव केवळ एक धार्मिक विधी नसून घराघरातील नातेसंबंध, प्रेम, भक्ती आणि एकोपा यांचा उत्सव आहे हे अधोरेखित करते. शांभवीसारख्या छोट्या मुलाच्या निरागसतेतून गणपती बाप्पावरील निखळ प्रेम आणि भावनांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. या आठवणीने कुटुंबीयांसह परिसरातील अनेकांचे मन हेलावले. गणेशोत्सव अशा अनेक नात्यांना अधिक घट्ट करणारा असतो याची प्रचिती या प्रसंगातून आली.
व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, 50 हजार उकळले, ब्लॅकमेलिंगला कंटाळत तरुणानं…
महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा शेवट म्हणजे मोठ्या जल्लोषात आणि भावनिक वातावरणात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दहा दिवस भक्ती, आनंद आणि उत्साहाने साजरा झाल्यानंतर विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण शहर, गाव आणि परिसर बाप्पाच्या गौरवाने उजळून निघाला. विसर्जनाच्या दिवशी ढोल-ताशांचा गजर, लेझीम नृत्य आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या गजर भक्तांनी केला. मोठ्या मिरवणुकीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी झाले होते.

