Mumbai Municipal Corporation Important Instructions for Ganpati Festival : बृहन्मुंबई महानगपालिकेनं गणपती उत्सवासाठी काही महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. हे निर्देश काही पुलांसंदर्भात आहेत. शहरातले काही पूल धोकादायक असल्यामुळे महापालिकेनं आणि पोलिसांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड रेल्वे उड्डाणपूल, आर्थर रोड रेल्वे उड्डाणपूल किंवा चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपूल, भायखळा रेल्वे उड्डाणपुलावरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे उड्डाणपूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी–कॅरोल रेल्वे उड्डाणपूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे उड्डाणपूल आदींवरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
Nagpur News: पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून मूकबधिर मुलाचा मृत्यू, बॉडी कुशित घेत आई तशीच बसून; पाहून सारे सुन्न
या १२ पुलांवर एकावेळेस अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनिक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली उतरल्यावर घ्यावा. पुलावर एका वेळेस भाविकांनी जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे, पोलीस व बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे, असं आवाहन करण्यात येत आहे.
Gunaratna Sadavarte : जरांगे STOP THAT, जरांगेला मुंबईत NO ENTRY; गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर जहरी टीका
‘लालबागचा राजा’ची सुरक्षा वाढवली
मुंबईतील ‘लालबागचा राजा’ मंडळाने सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत केली आहे. यूट्यूबर ज्योती मल्होत्राने रेकी केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मंडळाने परिसरात २५० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. अत्याधुनिक कृत्रिम प्रज्ञेची मदत घेण्यात येत आहे. गणेशोत्सवात भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

