Devendra Fadnavis : मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात 100 बेड असणारे रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यासोबत चार निर्णय राज्यमंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
मुंबईतील मुसळधार पावसामुळे एकनाथ शिंदे हे मिठी नदीची पाहणी करण्यासाठी गेले होते. सलग दुसऱ्या आठवड्यात शिंदेंच्या अनुपस्थितीत कॅबिनेट बैठक पार पडली. गेल्या आठवड्यात शिंदे काश्मीर दौऱ्यामुळे गैरहजर होते.
कोणकोणते मंत्रिमंडळ निर्णय?
1. मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि रिसर्च सेंटरमध्ये 100 खाट असलेले रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्यास मंजुरी देण्यात आली. महसूल, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने हा निर्णय घेतला.
2. कोल्हापुरातील सावित्रीबाई फुले महिला सहकारी औद्योगिक वसाहत लिमिटेड संस्थेस कसबा करवीर, बी वॉर्ड, कोल्हापूर येथील गट क्र. 697/3/6 मधील 2 हेक्टर 50 आर जमीन देण्याचा निर्णय महसूल, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने घेतला.
Gyanesh Kumar : मतचोरीचे आरोप फेटाळले, मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध ‘इंडिया’ आघाडी आक्रमक, महाभियोग प्रस्ताव काय असतो?
3. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मौजे वेंगुर्ला-कॅम्प गवळीवाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्यास मान्यता देण्याचा निर्णय महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला.
Eknath Shinde | ठाण्यात धो-धो पाऊस, मदतीसाठी स्वतः एकनाथ शिंदे रस्त्यावर, ठाणेकरांना आवाहन
4. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट-क (तांत्रिक) संवर्गातील विविध पदावर 29 दिवस तत्त्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यास वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे.
B Sudarshan Reddy : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीचं धक्कातंत्र, विरोधी पक्षांच्या उमेदवाराची घोषणा
पावसाचाही आढावा
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. राज्यातील 12 ते 14 लाख एकरावरील पीक बाधित झालं असून शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. पंचनाम्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात असून जनावरांचंही नुकसान झालं आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं

